IND vs SA T20 : हार्दिक-गिलचं कमबॅक, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियातून चौघांना डच्चू!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे.
कटक : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. कटकमध्ये होत असलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. हार्दिक पांड्याला आशिया कपच्या फायनलवेळी दुखापत झाली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळू शकला नाही. तर शुभमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टवेळी मानेला दुखापत झाली, त्यामुळे तो टेस्ट सीरिज आणि वनडे सीरिजमधून बाहेर झाला.
भारतामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी टीम इंडिया फक्त 10 मॅच खेळणार आहे, यातल्या 5 मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर उरलेल्या 5 मॅच न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने गतविजेत्या भारतासाठी ही सीरिज अत्यंत महत्त्वाची आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवड झालेल्या याच 15 खेळाडूंची निवड होण्याती शक्यता आहे.
advertisement
चौघांना टीम इंडियातून डच्चू
या सामन्यातून संजू सॅमसन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांना डच्चू देण्यात आला आहे. दोन ऑलराऊंडर आणि एका स्पिनरसह टीम इंडिया या सामन्यात मैदानात उतरली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
advertisement
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) , एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया
Location :
Cuttack,Odisha (Orissa)
First Published :
December 09, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA T20 : हार्दिक-गिलचं कमबॅक, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियातून चौघांना डच्चू!










