IND vs SA : ऋषभने आयडिया दिली, टेम्बाने गुपचूप ऐकलं! कुलदीपने पुढच्याच बॉलवर कॅप्टनला ड्रेसिंग रुममध्ये धाडलं, स्टंप माईकवर काय ऐकू आलं?

Last Updated:

Rishabh pant stump mic : टेम्बाने बॉल डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात बॉल ध्रुव जुरैलच्या हातात पाठवला. त्यावर ध्रुवने कोणतीही चूक केली नाही.

Rishabh pant stump mic
Rishabh pant stump mic
India vs South Africa 1st Test : कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जात असलेल्या साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्या दोन्ही ओपनर्सला माघारी धाडल्यानंतर शुभमन गिलने दुसऱ्या बाजून स्पिनर्सला कामाला लावलं. अक्षर पटेलनंतर शुभमनने कुलदीप यादवला बॉलिंग दिली. आपला हुकमी एक्का मैदानात आल्यावर कुलदीपने कुणालाच नाराज केलं नाही. कुलदीप यादवने पहिली ओव्हर टाकली पण त्यात कुलदीपला विकेट मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने बुमराह प्रेशर टाकत असताना विकेटकीपर ऋषभ पंतने एक आयडिया कुलदीपला दिली.

आता स्विप मारायला जाईल...

टेम्बा बावुमाला थोडंफार हिंदी येतं, हे ऋषभला माहिती होतं. स्टंपच्या मागून ऋषभने कुलदीपला टीप दिली. हा आता स्विप मारायला जाईल. याने आधीही असंच केलं आहे, असं ऋषभ पंत म्हणाला. त्यावेळी दोन्ही अतिरिक्त विकेटकीपर असलेल्या ध्रुव जुरैल आणि केएल राहुलला स्लिपला लावलं. त्यावेळी टेम्बाने बॉल डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात बॉल ध्रुव जुरैलच्या हातात पाठवला. त्यावर ध्रुवने कोणतीही चूक केली नाही.
advertisement
advertisement

बॉल बॅटच्या कडाला लागला

डावाच्या 16 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवने टेम्बा बावुमाला बाद केलं. बावुमाने लेग स्टंपवर पिच केलेल्या स्पिन बॉलचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल उसळला, त्याच्या बॅटच्या आतील कडाला लागला आणि लेग-स्पिनर ध्रुव जुरेलच्या उजवीकडे गेला, ज्याने एक शानदार झेल घेतला. अशा प्रकारे कुलदीप यादवने भारताचे तिसरं यश निश्चित केलं.
advertisement

बुमराहने सलामीवीर पाडले

दरम्यान, चांगली सुरूवात केल्यानंतर साऊथ अफ्रिकेची टीम ढेपाळली. जसप्रीत बुमराहने 11 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेला दुसरा झटका लागला. दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बुमराहनेच माघारी धाडलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : ऋषभने आयडिया दिली, टेम्बाने गुपचूप ऐकलं! कुलदीपने पुढच्याच बॉलवर कॅप्टनला ड्रेसिंग रुममध्ये धाडलं, स्टंप माईकवर काय ऐकू आलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement