IND vs SA 1st Test : टेम्बा बावुमा सगळा प्लॅन बनवून आलाय! कोलकाता कसोटीआधी टीम इंडियाला दिली वॉर्निंग, 'WTC जिंकल्यानंतर...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Temba Bavuma On Kolkata Test : भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकणं, ही अशी गोष्ट आहे, जी आमच्या टीमला खूप काळापासून साध्य करता आलेली नाही.
Temba Bavuma Warning Team India : दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा याने आगामी भारत दौऱ्यातील 2 मॅचेसच्या कसोटी मालिकेपूर्वी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. या दौऱ्यात भारताला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवून कसोटी सिरीज जिंकणं हे त्यांच्यासाठी जवळपास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकण्याएवढेच महत्त्वाचं आहे. बावुमाने ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी मॅचपूर्वी टीमची महत्वाकांक्षा स्पष्ट केली. बावुमा म्हणाला की, ही सिरीज आमच्या टीमसाठी या वर्षातील सर्वात मोठी 'मार्की इव्हेंट' आहे, कारण यावेळी त्यांच्या पारंपरिक 'बॉक्सिंग डे' आणि 'न्यू इयर्स' टेस्ट मॅचेस शेड्यूलमध्ये नाहीत.
भारतात मॅच जिंकणं दुसरं मोठं यश - टेम्बा बावुमा
बावुमा पुढे म्हणाला, "वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणं, यापेक्षा मोठे यश दुसरं कोणतं नाही, पण त्या दुसऱ्या क्रमांकावर मला वाटतं की, भारतात मॅच जिंकणे हे असेल." त्याने स्पष्ट केले की, "ही अशी गोष्ट आहे, जी आमच्या टीमला खूप काळापासून साध्य करता आलेली नाही. त्यामुळे हे ध्येय आमच्या 'अँबिशन'च्या यादीत नक्कीच सर्वात वर आहे." त्याने कबूल केले की, "आम्हाला या आव्हानाची 'मॅग्नीट्यूड' पूर्णपणे माहीत आहे. आमच्या टीममधील काही जणांनी यापूर्वी इथे झालेल्या पराभव अनुभवला आहे, त्यामुळे आम्हाला येथे काय साध्य करायचे आहे, याची चांगलीच जाणीव आहे," बावुमा म्हणाला.
advertisement
भारतीय टीममध्ये तोडीसतोड खेळाडू - बावुमा
"आम्ही या चॅलेंजसाठी खूप उत्सुक आहोत. दोन्ही टीम्सची सध्याची रचना पाहता ही मॅच खूप चांगली होईल, अशी अपेक्षा आहे," बावुमाने व्यक्त केले. भारतीय टीममध्ये तोडीसतोड खेळाडू आहेत, पण त्यांच्याकडे थोडा अनुभव देखील आहे. आमच्या टीमचीही परिस्थिती थोडी तशीच आहे, पण आमचे प्लेयर्स जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी सामना करण्यासाठी आतुर आहेत, असे त्याने सांगितले. बावुमाने सांगितले की, एक बॅटर म्हणून, अशा कंडिशन्समध्ये यशस्वी होणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही खेळण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. भारतात येणे हे खूप मोठे 'चॅलेंज' आहे, असंही बावुमा म्हणाला.
advertisement
'चोकर्स' टॅगबद्दल बावुमा काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भूतकाळात चिकटलेल्या 'चोकर्स' या 'टॅग'बद्दल बावुमाने सांगितलं की, सध्याची टीम ही नकारात्मक मानसिकता घेऊन फिरत नाही. त्याने आठवण करून दिली की, आमच्या टीममधील काही प्लेयर्स त्या जुन्या 'वर्ल्ड कप्स'च्या वेळेस जन्माला देखील आले नव्हते. त्यामुळे ते ओझे आम्ही बाळगत नाही, असं बावुमा म्हणाला. WTC च्या विजयामुळे टीममध्ये सकारात्मकता वाढली आहे. आम्हाला भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 2 नव्हे, तर 3 मॅचेसची सिरीज खेळायला आवडेल, असंही बावुमाने म्हणत मनातली इच्छा व्यक्त केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 7:14 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 1st Test : टेम्बा बावुमा सगळा प्लॅन बनवून आलाय! कोलकाता कसोटीआधी टीम इंडियाला दिली वॉर्निंग, 'WTC जिंकल्यानंतर...'


