IND vs SA Final : All THE BEST! गौतम गंभीरपासून कर्णधार सूर्यकूमार यादवचा भारतीय महिला संघाला खास मेसेज, VIDEO

Last Updated:

आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना उद्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 ला रंगणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे.

IND vs SA Final
IND vs SA Final
India vs South Africa Final World Cup 2025 : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना उद्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 ला रंगणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे.या सामन्याची संपूर्ण भारतवासीय उत्सुकतेने वाट पाहतायत. दरम्यान या सामन्याआधी भारताच्या पुरुष संघाने महिला संघाला खास मेसेज दिला आहे. यासंबंधित व्हिडिओ आता बीसीसीआयने शेअर केला आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीरपासून शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराहपर्यंत सर्व क्रिकेटपटूंनी अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधी पुरूष खेळाडूंनी महिला खेळाडूंना खास मेसेज दिला आहे.या मेसेजमध्ये कोण काय काय बोललं आहे?
advertisement
"मी महिला संघाला शुभेच्छा देऊ इच्छितो. फक्त या क्षणाचा आनंद घ्या. न घाबरता क्रिकेट खेळा आणि चुका करण्यास घाबरू नका. तुम्ही आधीच संपूर्ण देशाला अभिमानाने गौरवले आहे, असे गौतम गंभीर म्हणाला आहे. "मी संपूर्ण संघाला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. स्पर्धेत तुमचा आतापर्यंतचा प्रवास अद्भुत राहिला आहे. तुम्ही जसे आहात तसे खेळत राहा, असा सल्ला सूर्यकुमार यादवने दिला आहे.
advertisement
"तुम्हाला अनेक विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही." म्हणून या क्षणाचा आनंद घ्या. तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही. तू आधीच उत्तम क्रिकेट खेळत आहेस. स्वतःला मागे टाक आणि क्षणाचा आनंद घे. बाकीचे स्वतःची काळजी घेतील,असे जसप्रीत बुमराह म्हणाला. अर्शदीप सिंग म्हणाला की ट्रॉफी आधीच आली आहे. तुला फक्त ती उचलायची आहे. फक्त तुझा नैसर्गिक खेळ खेळ.
advertisement
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत भारतासमोर विजयासाठी 339 धावांचे लक्ष्य ठेवले. महिला क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही इतके मोठे लक्ष्य गाठले गेले नव्हते. भारतीय महिला क्रिकेट संघाने हार मानण्यास नकार दिला. जेमिमा रॉड्रिग्जने शेवटपर्यंत झुंज दिली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला. यासोबतच सात वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेत प्रवास संपुष्टात आला.
दरम्यान भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत खेळत आहे. ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाला पराभूत केल्यानंतर, भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : All THE BEST! गौतम गंभीरपासून कर्णधार सूर्यकूमार यादवचा भारतीय महिला संघाला खास मेसेज, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement