नवी मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडियवर झालेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर वर्ल्डकप जिंकणारा भारत हा तिसरा महिलांचा संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २९८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकी खेळी केली. उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट वगळता अन्य कोणाला मोठी खेळी करता आली नाही. लॉराने १०१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. मात्र संघाला विजय मिळून देण्यास दिला अपयश आले.
नवी मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडियवर झालेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर वर्ल्डपक जिंकणारा भारत हा तिसरा महिलांचा संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २९८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकी खेळी केली. उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट वगळता अन्य कोणाला मोठी खेळी करता आली नाही. लॉराने १०१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. मात्र संघाला विजय मिळून देण्यास दिला अपयश आले.
फक्त ३० चेंडू भारत होणार वर्ल्डकप चॅम्पियन? दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत हव्यात ५३ धावा
आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने फायनल मॅचमध्ये शतकी खेळी केली. एकाबाजूने विकेट पडत असताना लॉराने दुसऱ्या बाजूने अँकर खेळी करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. लॉराने १०१ धावा केल्या.
द.आफ्रिकेला ९० चेंडूत हव्यात ११६ धावा. ३५ षटकात केल्या ५ बाद १८३ धावा
दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत, १२० चेंडूत हव्यात १४९ धावा; मॅचवर टीम इंडियाची पकड मजबूत
२५ ओव्हरनंतर चॅम्पियन होण्यासाठी टीम इंडियाला हव्यात ६ विकेट, तर आफ्रिकेला १७२ धावा
शेफाली वर्माचा जलवा अंतिम सामन्यात फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही कायम आहे. आपल्या पहिल्याच षटकात सुने लूसला बाद केल्यानंतर, आता तिने आफ्रिकेची स्टार अष्टपैलू खेळाडू मेरिजान कॅपला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
लॉरा वोल्वार्ड्ट २५ धावांवर बाद, शेफाली वर्माने घेतली विकेट; दक्षिण आफ्रिका ३ बाद ११४
दोन विकेट पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लूस आणि लॉरा वोल्वार्ड्ट डावाची सूत्रे हाती घेतली आहेत. १५ व्या षटकात अमनजोत कौरविरुद्ध या दोघींनी काही आक्रमक फटके मारले. १५ षटकानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर २ विकेट्सवर ७८ धावा केल्या आहे.
आफ्रिकेची आणखी एक विकेट, ॲनेके बॉशला शून्यावर बाद केले. द. आफ्रिका २ बाद ६२
भारताला मिळाली पहिली विकेट, ताझमिन ब्रिट्स रनआऊट; द.आफ्रिकेच्या १० ओव्हरमध्ये १ बाद ५२ धावा. अजून ४० ओव्हरमध्ये हव्यात २४७ धावा
रेणुका सिंगच्या दुसऱ्या षटकात भारताने एक महत्त्वाचा आणि मौल्यवान रिव्ह्यू गमावला. ताझमिन ब्रिट्सविरुद्धच्या एलबीडब्ल्यू (LBW) च्या अपीलवर कर्णधार हरमनप्रीत कौरने अगदी शेवटच्या सेकंदाला डीआरएस (DRS) घेतला, परंतु रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. यापूर्वीही एका चेंडूवर रेणुकाने जोरदार अपील केली होती, पण त्या वेळी देखील चेंडू स्विंग होऊन लेग-साईडकडे गेला होता. दोन षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने सावध फलंदाजी केली असून, त्यांनी कोणताही विकेट न गमावता १० धावा केल्या आहेत.
२९९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघ मैदानात उतरला आहे. लॉरा वोल्वार्ड्ट आणि ताझमिन ब्रिट्स यांनी डावाची सुरुवात केली, तर टीम इंडियाकडून गोलंदाजीची सुरुवात रेणुका सिंग करणार आहे. आता भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांना या मोठ्या स्कोअरचा यशस्वी बचाव करण्यास यश आल्यास भारत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावेल.
ICC वर्ल्डकप फायनलमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत ५० ओव्हरमध्ये ७ बाद २९८ धावा केल्या. भारताकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकी केली केली.
दीप्ती शर्माने पुन्हा एकदा आपल्या क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत एकदिवसीय कारकिर्दीतील १८वे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण करताच ऋचा घोषने तिला मिठी मारून तिचे अभिनंदन केले.