IND W vs SA W Final : हरमनप्रीतवर आली धोनीसारखी परिस्थिती! मॅच नाही तर वर्ल्ड कप फायनलआधी 'या' गोष्टीचं प्रेशर

Last Updated:

ICC Womens Cricket World Cup Final : वुमेन्स वर्ल्ड कप विजेतेपद महिला क्रिकेटसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असं मोठं वक्तव्य टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने केलं आहे.

ICC Womens Cricket World Cup Final
ICC Womens Cricket World Cup Final
IND vs SA, World Cup Final : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप वनडे स्पर्धेत भारताचा सामना तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. त्याआधी टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. 'क्रिकेटवेड्या भारतात वर्ल्ड कप विजेतेपद महिला क्रिकेटसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल,' असं मोठं वक्तव्य टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने केलं आहे. त्यावेळी तिने आपल्यावर फायनलचं तसेच आणखी एक प्रेशर असल्याचं कबुल केलं आहे.

सकारात्मक बदल घडेल - हरमनप्रीत कौर

टीम इंडियाने 2005 आणि 2017 नंतर भारतीय महिला संघाने आता पुन्हा वन-डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. '2017 मध्ये आम्ही उपविजेते ठरून मायदेशात परतलो, त्यानंतर इथल्या महिला क्रिकेटमध्ये मोठे, सकारात्मक बदल झाले. महिलांचे क्रिकेटमध्ये येण्याचे प्रमाण वाढले. देशांतर्गत स्पर्धांमधील सहभागाचा आकडाही मोठा झाला आहे, असं म्हणत हरमनप्रीतने सकात्मक गोष्टीकडं लक्ष वेधलं.
advertisement

तिकीट मिळवण्याचं प्रेशर - हरमनप्रीत कौर

टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने यावेळी आपल्या तिकीट मिळवण्याचं प्रेशर देखील असल्याचं म्हटलं आहे. अनेकजण सामन्याचं तिकीट मागत आहेत. पण अशा लहान गोष्टीचं प्रेशर असलं तर ते तुम्हाला आनंद देणारं देखील असतं, असं हरमनप्रीत कौरने म्हटलं आहे.

वुमेन्स क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन

advertisement
'मी तर त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे, जेव्हा आपण महिला क्रिकेटकडे अधिक गांभीर्याने बघू आणि अधिकाधिक भारतीय मुली या खेळाकडे करिअर म्हणून बघतील,' अशी अपेक्षा हरमनप्रीतने व्यक्त केली. त्यामुळे आता वुमेन्स क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे WPL मुळे हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज या खेळाडू लोकप्रिय झाल्या, हे देखील नाकारता येत नाही.
advertisement

देशवासियांना कौतुक वाटत असेल

दरम्यान, सेमीफायनल मॅच आणि जेमिमाची कामगिरी संपूर्ण संघासाठी अभिमानाचा क्षण आहे. ज्यापद्धतीने गेल्या दोन सामन्यांत आम्ही कामगिरी केली आहे, त्यानंतर मला खात्री आहे, की देशवासियांनाही आमच्याबद्दल असेच कौतुक वाटत असेल,' असे हरमनप्रीतचे म्हणाली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND W vs SA W Final : हरमनप्रीतवर आली धोनीसारखी परिस्थिती! मॅच नाही तर वर्ल्ड कप फायनलआधी 'या' गोष्टीचं प्रेशर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement