IND vs SA : आधी रहाणे आता गंभीर! तो कुणाचंच ऐकत नाही; कोलकाता टेस्टआधी राडा, अखेर गांगुलीने मिटवला वाद

Last Updated:

India vs South Africa 1st Test : गंभीरने मंगळवारी सकाळी बॅटिंग कोच सीतांशू कोटक यांच्यासोबत खेळपट्टीची पाहणी केली. भेटीदरम्यान त्याने सुजानशी दीर्घ चर्चा केली. पण...

India vs South Africa 1st Test pitch curator gautam gambhir
India vs South Africa 1st Test pitch curator gautam gambhir
IND vs SA Kolkata Test : येत्या 14 नोव्हेंबरला भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. त्याआधी मोठा वाद पेटला होता. बंगाल क्रिकेट असोसिएशन मधील सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्या खेळाडूंना लक्षात घेता पहिल्या कसोटीसाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टी हवी आहे. पण तो कुणाचंच ऐकत नाही. ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी स्पष्ट केलं आहे की, ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल असेल.

गंभीरची इच्छा पूर्ण केली नाही

गंभीरने मंगळवारी सकाळी बॅटिंग कोच सीतांशू कोटक यांच्यासोबत खेळपट्टीची पाहणी केली. भेटीदरम्यान त्याने सुजानशी दीर्घ चर्चा केली. पण सुजन मुखर्जी यांनी गंभीरची इच्छा पूर्ण केली नाही. सुजन मुखर्जी यांनी नकार दिल्याने गंभीर संतापला होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सुजन मुखर्जी यांनी माध्यमांशी बोलताना, अशी कोणतीही मागणी नसल्याचं म्हटलं.
advertisement

मागणी केली नाही, पण इच्छा आहे

दैनिक जागरणने सुजन यांना यावर प्रश्न केला होता. गंभीरने कोलकाता टेस्टसाठी स्पिनर्सला अनुकूल अशी खेळपट्टी मागितली होती का? असा सवाल केल्यावर सुजन यांनी तुटक उत्तर दिलं. गंभीरने अशी कोणतीही मागणी केली नाही, पण त्यांची इच्छा आहे, असं सुजन यांनी म्हटलं अन् वाद पेटला. प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रकरणात उडी घेतली अन् प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघ व्यवस्थापनाने अशी कोणतीही मागणी केलेली नाही, असं दादा म्हणाला.
advertisement

अजिंक्य रहाणेचे आरोप

ईडनची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल मानली जात आहे आणि फिरकीपटूंच्या बळावर भारताने येथे अनेक सामने जिंकले आहेत. तर केकेआरचा माजी कॅप्टन अजिंक्य रहाणे याने देखील प्रेस कॉन्फरेन्समध्ये इडन गार्डनच्या पीच क्युरेटरवर आरोप केले होते. पीच क्युरेटर आपली बाजू ऐकून घेत नाहीत, असं अजिंक्य रहाणे याने म्हटलं होतं. अशातच आता गंभीर देखील क्युरेटरवर संतापल्याचं पहायला मिळालं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : आधी रहाणे आता गंभीर! तो कुणाचंच ऐकत नाही; कोलकाता टेस्टआधी राडा, अखेर गांगुलीने मिटवला वाद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement