IND vs SA 1st Test : कोलकाता टेस्टमध्ये शुभमनचा मास्टरस्ट्रोक, चार स्पिनर्ससोबत टीम इंडिया मैदानात, पाहा प्लेइंग इलेव्हन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs SA 1st Test Playing 11 : टेम्बा बावुमाचा संघ आजपासून ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या मालिकेत विजय मिळण्याच्या तयारीत आहे.
India Vs South Africa Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर सकाळी 9:30 वाजता खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ 25 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याचा प्रयत्न करेल. आफ्रिकेच्या संघाने शेवटची वेळ 25 वर्षांपूर्वी भारतात कसोटी मालिका जिंकली होती. आता, टेम्बा बावुमाचा संघ आजपासून ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या मालिकेत विजय मिळण्याच्या तयारीत आहे.
चार स्पिनर्स खेळवण्याचा निर्णय
साऊथ अफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत चार स्पिनर्स खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग्टन सुंदर याचं बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोशन झालं असून तो तीन नंबरवर खेळताना दिसेल. तर कॅप्टन शुभमन गिल हा चौथ्या क्रमांकावर असेल. रवींद्र जडेजा,अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर या तीन ऑलराऊंडरसोबत टीम इंडिया खेळेल.
advertisement
दोन विकेटकीपर बॅटर
दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत ही मालिका जिंकून WTC मध्ये मजबूत स्थान तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ऋषभ पंत संघात परतला आहे आणि ध्रुव जुरेलला स्पेशालिस्ट बॅटर म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. दोन्ही विकेटकिपर बॅटर्सला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आहे.
1ST Test. India XI : K.L.Rahul, Y.Jaiswal, W.Sundar, S.Gill (c), R.Pant (wk), R.Jadeja, D.Jurel, A.Patel, K.Yadav, J.Bumrah, M.Siraj https://t.co/okTBo3qxVH #TeamIndia #INDvSA #1stTest @IDFCfirstbank
— BCCI (@BCCI) November 14, 2025
advertisement
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वायन मुल्डर, टेम्बा बावुमा (C), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (WK), सायमन हार्मर, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (C), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 1st Test : कोलकाता टेस्टमध्ये शुभमनचा मास्टरस्ट्रोक, चार स्पिनर्ससोबत टीम इंडिया मैदानात, पाहा प्लेइंग इलेव्हन!


