IPL 2026 : संजू सॅमसनची 'एक्झिट' पण राजस्थानच्या दोन खेळाडूंवर टांगती तलवार, RR च्या हट्टामुळे मॅचविनरला डच्चू?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026 RR Mega trade Deal : सध्या राजस्थान रॉयल्सच्या पर्श मध्ये केवळ 30 लाख रुपये शिल्लक आहेत, तर सॅम करनची सध्याची लिलाव किंमत 2.4 कोटी रुपये आहे.
IPL 2026 Mega trade : आयपीएल 2026 च्या आगामी सीझनपूर्वी, राजस्थान रॉयल्स संघाला मोठी स्ट्रॅटेजी बदलावी लागण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा ऑल-राऊंडर सॅम करनला संघात सामील करून घेण्याच्या प्रयत्नात राजस्थान रॉयल्ससमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. ही अडचण म्हणजे त्यांच्याकडे असलेला अत्यंत कमी पर्स बॅलन्स आणि परदेशी खेळाडूंची संख्या...
30 लाख रुपये शिल्लक
सध्या राजस्थान रॉयल्सच्या पर्समध्ये केवळ 30 लाख रुपये शिल्लक आहेत, तर सॅम करनची सध्याची लिलाव किंमत 2.4 कोटी रुपये आहे. नियमांनुसार, 2.4 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या एका परदेशी खेळाडूला रिलीज करूनच राजस्थान रॉयल्सला हा मॅटर फिक्स करता येणार आहे.
एक स्लॉट रिकामा करणं गरजेचं
advertisement
राजस्थान रॉयल्सच्या संघात सध्या आठ परदेशी खेळाडू आहेत आणि नियमानुसार संघात कमाल आठच परदेशी खेळाडू ठेवता येतात. करनला संघात घेण्यासाठी एक स्लॉट रिकामा करणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर पर्स बॅलन्सची अडचणही दूर करावी लागणार आहे.
वानिंदू हसरंगा की महेश थीक्षणा?
यावर तोडगा काढण्यासाठी राजस्थान रॉयल्स दोन श्रीलंकन स्पिनर्स म्हणजेच वानिंदू हसरंगा आणि महेश थीक्षणा यांना रिलीज करण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे. मात्र, हे दोन्ही मॅचविनर खेळाडू आहेत. हसरंगाला 5 कोटी 25 लाख आणि थीक्षणाला 4 कोटी 40 लाख रुपयांना संघात घेण्यात आले होते. या दोघांपैकी एकाला रिलीज केल्यास पर्श बॅलन्स आणि परदेशी खेळाडूचा कोटा या दोन्ही समस्या सुटतील आणि सॅम करनला संघात घेण्याचा मार्ग मोकळा होईल.
advertisement
राजस्थानची ट्रेड विंडोमध्ये उडी
दरम्यान, आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावापूर्वी ट्रेड विंडोमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी डील होण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑल-राऊंडर रवींद्र जडेजा यांच्यात अदलाबदल होण्याची दाट चर्चा आहे. या डील मध्ये इंग्लंडचा ऑल-राऊंडर सॅम करन देखील राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 11:08 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : संजू सॅमसनची 'एक्झिट' पण राजस्थानच्या दोन खेळाडूंवर टांगती तलवार, RR च्या हट्टामुळे मॅचविनरला डच्चू?


