Mumbai Indians : मुंबईने शेवटच्या क्षणी गेम फिरवला, अर्जुनचं डिल फायनल, बदल्यात घेतला रोहितचा फेवरेट लेग स्पिनर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या रिटेशनशनला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारी सर्व 10 टीमना त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे.
मुंबई : आयपीएल 2026 च्या रिटेशनशनला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारी सर्व 10 टीमना त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे, यासाठी सगळ्या टीम डील फायनल करत असतानाच मुंबई इंडियन्सने यात आघाडी घेतली आहे. मुंबईने गुरूवारी शार्दुल ठाकूर आणि शरफेन रदरफोर्ड यांना टीममध्ये आणलं. शार्दुलसाठी मुंबईने लखनऊ सुपर जाएंट्ससोबत तर रदरफोर्डसाठी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड केलं. यानंतर आता मुंबईने अर्जुन तेंडुलकरलाही ट्रेड केलं आहे.
मुंबईने अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जाएंट्सकडे दिलं आहे, याबदल्यात मुंबईने मयंक मार्कंडेला घेतलं आहे. मयंक मार्कंडेसाठी मुंबईने केकेआरसोबत डील केलं आहे, याआधी मुंबई राहुल चहरलाही टीममध्ये घेण्यासाठी इच्छुक असल्याचं वृत्त होतं. मयंक मार्कंडे हा याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मयंकचं आयपीएलमध्ये पदार्पणही मुंबई इंडियन्सकडून झालं होतं.
मुंबई विल जॅक्सलाही सोडणार?
advertisement
दुसरीकडे मुंबई इंडियन्स इंग्लंडचा ऑलराऊंडर विल जॅक्सलाही सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विल जॅक्सचं मुंबई मधील स्थान धोक्यात असल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. तर जॉनी बेअरस्टो मात्र मुंबईच्या टीममध्ये कायम राहू शकतो. आयपीएल 2025 च्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये बेअरस्टो मुंबईच्या टीममध्ये आला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 12:02 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबईने शेवटच्या क्षणी गेम फिरवला, अर्जुनचं डिल फायनल, बदल्यात घेतला रोहितचा फेवरेट लेग स्पिनर!


