Jemimah Rodrigues : 'मला झेपत नव्हतं म्हणून मी लगेच...', जेमीमाचा शॉकिंग खुलासा, का डिलिट केलं WhatsApp?

Last Updated:

Jemimah Rodrigues Deleted WhatsApp : जेमीमाला जवळपास 1000 हून अधिक व्हॉट्सॲप मेसेज आले होते, ज्यामुळे तिला फायनलच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणं कठीण झाले.

Jemimah Rodrigues Deleted WhatsApp
Jemimah Rodrigues Deleted WhatsApp
Jemimah Rodrigues Uninstall WhatsApp : टीम इंडियाच्या पोरींनी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर इतिहास रचला होता. टीम इंडियाने याच मैदानावर सेमीफानयलमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. या विजयाची हिरो ठरली जेमीमा रॉड्रिग्स... प्रमुख बॅटर जेमिमा रॉड्रिग्स हिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या क्रिक्रेट करियरच्या आयुष्यातील एक अनुभव शेअर केला आहे. वर्ल्ड कप फायनलपूर्वी जेमीमाला व्हॉट्स अप डिलिट करावं लागलं होतं.

सामना जिंकवून देणारी इनिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायन मॅचनंतर तिला आलेल्या अडचणींचा तिने खुलासा केला आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील शानदार आणि सामना जिंकवून देणारी इनिंग खेळल्यामुळे तिचं नाव सर्वत्र गाजलं. मात्र, या यशामुळे तिला सोशल मीडिया आणि मोबाईलवर सतत येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसमुळे मोठी समस्या निर्माण झाली होती.

1000 हून अधिक व्हॉट्सॲप मेसेज

advertisement
जेमिमाच्या म्हणण्यानुसार, त्या महत्त्वपूर्ण विजयानंतर तिचा मोबाईल नंबर अनेक अनोळखी लोकांपर्यंत पोहोचला होता. या सततच्या 'हल्ल्यामुळे' तिचे लक्ष विचलित होऊ लागले. तिला जवळपास 1000 हून अधिक व्हॉट्सॲप मेसेज आले होते, ज्यामुळे तिला फायनलच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणं कठीण झाले. म्हणूनच, लक्ष विचलित होऊ नये म्हणून तिने व्हॉट्सॲप ॲप तात्पुरते अनइंस्टॉल करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement

आजही इंस्टाग्राम स्क्रोल करते तेव्हा....

मी गंमत करत नाहीये, माझ्याकडे खरोखर सुमारे 1000 हून अधिक व्हॉट्सॲप मेसेजेस होते. म्हणून मी फायनलपूर्वी व्हॉट्सॲपपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला. अगदी जवळच्या लोकांना मी कळवले की गरज पडल्यास त्यांनी सामान्य कॉल किंवा मेसेजद्वारे संपर्क साधावा, असं जेमीमा म्हणाली. मी आजही इंस्टाग्राम स्क्रोल करते, तेव्हा अचानक माझेच व्हिडिओ समोर येतात. कोणी ना कोणी माझ्याबद्दल बोलतच असतं, असंही जेमीमा म्हणाली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jemimah Rodrigues : 'मला झेपत नव्हतं म्हणून मी लगेच...', जेमीमाचा शॉकिंग खुलासा, का डिलिट केलं WhatsApp?
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Clash: भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते  भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव
भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव
  • भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव

  • भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव

  • भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव

View All
advertisement