Kuldeep Yadav : ऑस्ट्रेलिया दौरा सोडून आला, आता दक्षिण आफ्रिका सीरिजही मध्येच सोडणार, कुलदीपने BCCI कडे मागितली सुट्टी!

Last Updated:

भारताचा स्टार स्पिनर कुलदीप यादवने बीसीसीआयकडे रजा मागितली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून कुलदीप भारतात परत आला होता.

ऑस्ट्रेलिया दौरा सोडून आला, आता दक्षिण आफ्रिका सीरिजही मध्येच सोडणार, कुलदीपने BCCI कडे मागितली सुट्टी!
ऑस्ट्रेलिया दौरा सोडून आला, आता दक्षिण आफ्रिका सीरिजही मध्येच सोडणार, कुलदीपने BCCI कडे मागितली सुट्टी!
मुंबई : भारताचा स्टार स्पिनर कुलदीप यादवने बीसीसीआयकडे रजा मागितली आहे. कुलदीप नोव्हेंबरच्या अखेरीस लग्न करणार आहे, यासाठी त्याने बीसीसीआयकडे त्याच्या लग्नासाठी रजा मागितली आहे. कुलदीप सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्यात खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने आहेत. पहिली टेस्ट 14 नोव्हेंबर रोजी सुरू झाली, तर पाचवी टी-20 19 डिसेंबर रोजी खेळवली जाईल. दुसऱ्या टेस्टचा पाचवा दिवस 26 नोव्हेंबर रोजी होईल, तर पहिली वनडे 30 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले की, कुलदीप यादवने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रजा मागितली आहे. 'कुलदीपचे लग्न नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्याला किती दिवसांची रजा लागेल याचा विचार टीम व्यवस्थापन करेल', असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरच्या तणावामुळे आयपीएलमध्ये अनपेक्षित ब्रेक लागला, त्यामुळे कुलदीप यादवला त्याचे लग्न पुढे ढकलावे लागले.
advertisement

कुलदीप प्लेइंग इलेव्हनमध्ये

इंग्लंडचा माजी बॅटर केविन पीटरसनने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्स येथे होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये कुलदीप यादवचा समावेश करण्यास पाठिंबा दिला. वर्षातील चौथी टेस्ट खेळणाऱ्या कुलदीपने कोलकाता येथील पहिल्या टेस्टसाठी टीममध्ये आपले स्थान कायम ठेवले. त्याच्यासोबत अनुभवी ऑलराऊंडर रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी स्पिन बॉलिंग आक्रमण मजबूत केली आहे.
advertisement

कुलदीप यादवने इतिहास रचला

कोलकाता टेस्टच्या पहिल्या डावात कुलदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या आणि स्वतःसाठी एक महत्त्वाचा विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150+ विकेट्स घेणारा कुलदीप तिसरा भारतीय डावखुरा स्पिन बॉलर ठरला. याचसोबत तो रवींद्र जडेजा आणि झहीर खान यांच्या यादीत सामील झाला. कुलदीप हा भारतात 150 विकेट्स घेणारा दुसरा डावखुरा स्पिन बॉलर आहे.
advertisement

ऑस्ट्रेलिया दौरा सोडून आला

कुलदीप यादव हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-20 सीरिज अर्धवट सोडून भारतात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजचा सराव करण्यासाठी कुलदीपला टीम मॅनेजमेंटने भारतात पाठवलं आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध अनधिकृत टेस्ट मॅच खेळायला सांगितलं, त्यामुळे कुलदीप या सामन्यात इंडिया ए कडून खेळला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kuldeep Yadav : ऑस्ट्रेलिया दौरा सोडून आला, आता दक्षिण आफ्रिका सीरिजही मध्येच सोडणार, कुलदीपने BCCI कडे मागितली सुट्टी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement