फानयल पराभवानंतर हॉर्ट ब्रेक, तरी खचली नाही, दोनच आठवड्यात 'स्मृती'चा मुकूट हिसकावला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शतकीय खेळी करून देखील ती संघाला जिंकवून देऊ शकली नव्हती.त्यामुळे तिचा मोठा हॉर्ट ब्रेक झाला होता, पण ती खचली नाही. आणि तिने दोनच आठवड्यात स्मृतीचा मुकूट हिसकावला आहे.
Laura Wolvaardt Icc Womens Player of the Month Octomber 2025 : टीम इंडियाच्या महिला संघाने दोन आठवड्यापूर्वी वूमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर भारतात मोठा जल्लोष करण्यात आला. तर साऊथ आफ्रिकेच्या पराभवानंतर कर्णधार लॉरा वोल्वार्डला मोठा धक्का बसला होता. कारण शतकीय खेळी करून देखील ती संघाला जिंकवून देऊ शकली नव्हती.त्यामुळे तिचा मोठा हॉर्ट ब्रेक झाला होता, पण ती खचली नाही. आणि तिने दोनच आठवड्यात स्मृतीचा मुकूट हिसकावला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज ऑक्टोबर महिन्याच्या प्लेअर ऑफ द मंथ खेळाडूची घोषणा केली आहे. यामध्ये वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिला प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे तिने भारताची उपकर्णधार स्मृती मानधना आणि ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू अॅश गार्डनर यांना मागे टाकले.अशाप्रकारे तिने वर्ल्ड कप पराभवाच्या दोनच आठवड्यात बाजी मारन स्मृती मानधनाच्या हातून नंबर वनचा मुकूट हिसकावला आहे.
advertisement
लॉरा वोल्वार्ड हिने महिला विश्वचषकात आठ सामन्यांमध्ये 67.14च्या सरासरीने आणि 97.91 च्या स्ट्राईक रेटने 470 धावा केल्या आहेत. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खराब होती,संघ 69 धावांवर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात संघाने पुन्हा गती मिळवली, जिथे वोल्वार्ड हिने भारताविरुद्ध 70 धावा केल्या.
वोल्वार्ड हिने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 169 धावांची खेळी खेळली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 319 धावांचे लक्ष्य गाठण्यात आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यात मदत झाली. वोल्वार्डच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. तिने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यातही शानदार खेळी केली. तिने शतक ठोकले, परंतु दक्षिण आफ्रिका हारली होती.
advertisement
दरम्यान प्लेअर ऑफ द मंथ बनल्यानंतर आता वोल्वार्डने प्रतिक्रिया दिली आहे. महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक घटना असलेल्या भारतात झालेल्या विश्वचषकात संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर हा पुरस्कार जिंकणे हा सन्मान आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट सामने आणि उल्लेखनीय कामगिरी झाली, ज्यामुळे हा सन्मान आणखी अर्थपूर्ण झाला. स्पर्धा जिंकणे आदर्श ठरले असते, परंतु आम्हाला आमच्या विजयाचा आणि आमच्या अढळ भावनेचा अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की आयसीसी विश्वचषक विजेतेपद अगदी जवळ आले आहे. मी सर्वांच्या पाठिंब्याची प्रशंसा करतो आणि मैदानावर तुम्हाला अभिमानित करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन,असे वोल्वार्डने सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 7:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
फानयल पराभवानंतर हॉर्ट ब्रेक, तरी खचली नाही, दोनच आठवड्यात 'स्मृती'चा मुकूट हिसकावला


