MCA Election Result : MCA च्या निवडणुकीत पवार गटाचा भाजपला धक्का, नार्वेकरही जिंकले, आव्हाडांनी किती मतं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे वारे वाहत असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत शरद पवार गटाच्या पॅनलने भाजपला धक्का दिला आहे. जरी MCA ची निवडणूक असली तरी शरद पवार विरुद्ध आशिष शेलार असा लढा रंगला होता.
MCA Election Result : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे वारे वाहत असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत शरद पवार गटाच्या पॅनलने भाजपला धक्का दिला आहे. जरी MCA ची निवडणूक असली तरी शरद पवार विरुद्ध आशिष शेलार असा लढा रंगला होता. त्यामुळे या निवडणूकीत शरद पवार पॅनलचं वर्चस्व पाहायला मिळालं.त्यामुळे या निकालात कोण कोण किती किती मतांनी निवडून आले आहेत? हे जाणून घेऊयात.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीची त्रैवार्षिक निवडणूक आज पार पडली.या निवडणूकीचा अंतिम निकाल आता समोर आला आहे.या निकालानूसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे.जितेंद्र आव्हाड यांना या निवडणूकीत 201 मतं पडली होती. तर नवीन शेट्टी यांना 155 मतं मिळाली होती.त्यामुळे अशाप्रकारे आव्हाड यांनी 46 इतक्या मोठ्या फरकाने उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती.
advertisement
एमसीएच्या सचिव आणि सहसचिव पदी कोण?
एमसीएच्या सचिव पदी उमेश खानविलकर यांनी बाजी मारली आहे. उमेश खानविलकर यांना 227 मतं पडली होती तर त्यांच्या विरोधात असलेल्या शहाआलम शेखला 129 मतं मिळाली होती.त्यामुळे या निवडणूकीत 98 मतांनी उमेश खानविलकर यांनी ही निवडणूक जिंकली आहे. एमसीएच्या संयुक्त सचिवपदी निलेश भोसले 228 मतं पडली होती तर गौरव पायंडे यांना 128 मतं मिळाली होती.त्यामुळे या निवडणूकीत 100 मतांनी निलेश भोसले यांनी या निवडणूकीत बाजी मारली आहे.
advertisement
एमसीएच्या खजिनदार पदाच्या निवडणूकीत अरमान मलिकला 234 मतं मिळाली होती. तर सुरेंद्र शेवाळे यांना 119 मतं पडली होती.त्यामुळे 115 इतक्या मोठ्या फरकाने अरमान मलिक यांची खजीनदार पदी निवड झाली आहे.
आपेक्स काऊन्सिलच्यी सदस्यपदी 9 जणांची निवड
आपेक्स काऊन्सिलच्यी सदस्यपदी संदिप विचारे, सुरज सामंत, विघ्नेश कदम, मिलिंद नार्वेकर, भूषण पाटील, नदीम मेमोन,विकास रेपाले, प्रमोद यादव,निल सावंत या 9 सदस्यांची निवड झाली आहे.
advertisement
362 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 378 मतदारांपैकी 362 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. तर शिवसेना उबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान केलं नसल्याची माहिती मिळाली होती. हे मतदान पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणी घेण्यात आली होती.
अजिंक्य नाईक बिनविरोध
एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी भाजप नेते प्रसाद लाड, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विंहग सरनाईक यांनी अर्ज केला होता.पण निवडणूकीच्या दोन दिवस आधीच सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांनी बिनविरोध निवड झाली होती.
advertisement
एमसीए निवडणूकीचा अंतिम निकाल
शरद पवार पॅनल विजय उमेदवार
जितेंद्र आव्हाड -उपाध्यक्ष
उमेश खानविलकर - सचिव
निलेश भोसले - सहसचिव
अरमान मलिक- खजिनदार (आशिष शेलार पॅनल)
कौन्सिल मेंबर
प्रदीप गुप्ता
केनी भारत सचिदानंद
अपेक्स कौन्सिल मेंबर
विघ्नेश कदम
नदीम मेनन
मिलिंद नार्वेकर
विकास रेपाळे
भूषण पाटील
आशिष शेलार पॅनल (विजय उमेदवार)
advertisement
प्रमोद यादव
सुरज सामंत
संदीप विचारे
नील सावंत
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 10:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MCA Election Result : MCA च्या निवडणुकीत पवार गटाचा भाजपला धक्का, नार्वेकरही जिंकले, आव्हाडांनी किती मतं?


