Rohit Sharma : 'मोटा हो जाऊंगा, नहीं चाहिये भाई...', जयस्वालचा हट्ट पण रोहित चार हात लांब ठेवून पळाला, हॉटेलमधील Inside Video

Last Updated:

Rohit Sharma Viral Video : टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा सध्या डायटिंगवर असल्याचं पहायला मिळतंय. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्याच जयस्वाल देखील दिसतोय.

Rohit Sharma refuse to eat cake with Jaiswal celebrations
Rohit Sharma refuse to eat cake with Jaiswal celebrations
Team India hotel Inside Video : टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी केली. विशाखापट्टणममध्ये डावाची सुरुवात करताना यशस्वीने त्याने वनडे करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. शतक गाठण्यासाठी त्याने 111 बॉलचा सामना केला. त्याच्या शतकानंतर, यशस्वी विराट कोहलीसोबत नाबाद परतला. यशस्वीच्या कामगिरीचं आता सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. मात्र, या सामन्यात रोहित शर्माने देखील 75 धावांची भन्नाट कामगिरी केली. त्यानंतर आता त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

रोहितने केक खाल्लाच नाही

टीम इंडियाचा हिटमॅन सध्या अफलातून कामगिरी करताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितने 10 किलो वजन देखील कमी केलं होतं. अशातच रोहित आता डाएटवर असल्याचं पहायला मिळत आहे. रोहित शर्माने त्याचा आवडता केक देखील खायचं सोडून दिलंय. टीम इंडिया जेव्हा हॉटेलमध्ये जात होती, तेव्हा जयस्वालने हट्ट करून देखील रोहितने केक खाल्लाच नाही. तर विराटने जयस्वालसाठी आपला डाएट मोडला.
advertisement

विराटने जयस्वालसाठी डाएट प्लॅन मोडला

टीम इंडिया हॉटेलवर पोहोचली, तेव्हा विराट आणि जयस्वालसाठी केकचं आयोजन केलं गेलं होतं. त्यावेळी विराटने जयस्वालच्या हातात चाकू दिला अन् त्याला केक कापण्यास सांगितलं. त्यावेळी हॉटेल मालकाने शॅम्पेनचं आयोजन देखील केलं होतं. पण कुणीच घेत नाही, असं विराट म्हणाला. जयस्वालने केक कट केला अन् विराटला भरवला. विराटने जयस्वालसाठी डाएट प्लॅन मोडला. त्यानंतर जयस्वाल रोहितकडे वळाला पण...
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Shivaji Gunnabattula (@wander_vizag)



advertisement

मोटा हो जाऊंगा, नहीं चाहिये भाई

रोहित भाई थोडासा केक घे ना म्हणत यशस्वीने हिटमॅनला केक भरवण्याचा प्रयत्न केला पण रोहित चार हात लांबच थांबला अन् पळाला. मोटा हो जाऊंगा, नहीं चाहिये भाई, असं म्हणत रोहितने थेट आपल्या रुमकडे धाव घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement

टी-ट्वेंटी मालिका

दरम्यान, यशस्वी जयस्वालच्या शतकामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. आता टीम इंडिया साऊथ अफ्रिकाविरुद्ध पाच सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'मोटा हो जाऊंगा, नहीं चाहिये भाई...', जयस्वालचा हट्ट पण रोहित चार हात लांब ठेवून पळाला, हॉटेलमधील Inside Video
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement