PAK vs SL : पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन संघ घाबरला,8 खेळाडू स्पर्धा अर्ध्यावर सोडून जाणार

Last Updated:

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे.या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने श्रीलंकन संघ प्रचंड घाबरलेला आहे आणि संघातील 8 खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan vs Sri Lanka
Pakistan vs Sri Lanka
Pakistan vs Sri Lanka : श्रीलंका संघ सध्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातला पहिला वनडे सामना हा मंगळवारी पार पडला होता. या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेटने सामना जिंकला होता.यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे.या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने श्रीलंकन संघ प्रचंड घाबरलेला आहे आणि संघातील 8 खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला त्यांची नाचक्की झाली आहे.
advertisement
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या वनडे मालिका सूरू असताना इस्लामाबदमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाली होती. या हल्ल्यानंतर श्रीलंकन संघात एकच घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील आठ खेळाडू गुरुवारी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
श्रीलंका क्रिकेटच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की, श्रीलंकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. पहिला सामना आधीच खेळला गेला आहे, तर दुसरा गुरुवारी (13 नोव्हेंबर) होणार होता. पण पीटीआयच्या वृत्तानुसार हा सामना आता खेळला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण श्रीलंकेच्या 8 खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर श्रीलंकेचा संघ पाकिस्तान आणि झिम्बाब्वेसोबत त्रिकोणी मालिका खेळणार होता. पण आता आठ खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. रावळपिंडी इस्लामाबादच्या जवळ असल्याने, खेळाडूंनी त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आणि मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली.तर श्रीलंकन क्रिकेटच्या सूत्रांनुसार, मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडू पाठवले जातील अशी माहिती आहे.
advertisement
2009 ला झालेला श्रीलंकेवर हल्ला
2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक खेळाडू जखमी झाले होते आणि पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते. या हल्ल्यानंतर, जवळजवळ एक दशक परदेशी संघ पाकिस्तानचा दौरा करू शकले नाहीत आणि पाकिस्तानला त्यांचे घरचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळावे लागले होते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs SL : पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन संघ घाबरला,8 खेळाडू स्पर्धा अर्ध्यावर सोडून जाणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement