Palash Muchhal Smriti Mandhana Post : ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना मी सोडणार नाही...''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Palash Muchhal Instagram Post: स्मृतीने लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर काही वेळेतच पलाशने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
Palash Muchhal Instagram Post: टीम इंडियाची महिला स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिने आपलं लग्न मोडल्याचं जाहीर केल्यानंतर पलाश मुच्छलनेदेखील सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्मृतीने लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर काही वेळेतच पलाशने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
advertisement
23 नोव्हेंबर रोजी स्मृती आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार होतं. मात्र, काही कौटुंबिक कारणास्तव लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. लग्न मोडल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. स्मृती-पलाशचा विवाह पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याच वेळेस काही सोशल मीडिया अकाउंटवरून लग्न मोडलं असल्याचा दावा करण्यात आला. पलाश मुच्छलचे स्मृतीशिवाय आणखीदेखील प्रेम प्रकरण सुरू होतं, त्यातून लग्न मोडल्याचा दावा करण्यात आला.
advertisement
पलाशने मागील काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपांवर भाष्य करत लग्न मोडल्याचं मान्य करताना आता आयुष्यात पुढं जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
पलाशने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?
मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Palash Muchhal instagram story after wedding called off
advertisement
माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल निराधार अफवांवर लोक इतक्या सहजपणे प्रतिक्रिया देतात हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आहे आणि मी माझ्या विश्वासांना धरून राहून त्याचा सामना करेन. मला खरोखर आशा आहे की आपण, एक समाज म्हणून, अशा व्यक्तीबद्दल बोलण्यापूर्वी थांबायला शिकू, ज्याचे स्रोत कधीही ओळखले जात नाहीत. आपले शब्द अशा प्रकारे दुखवू शकतात जे आपल्याला कधीच समजणार नाहीत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Palash Muchhal Smriti Mandhana Post : ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना मी सोडणार नाही...''


