Vaibhav Suryvanshi : एका बिहारीवर महाराष्ट्र भारी! पृथ्वीच्या वादळी खेळीसमोर वैभव सुर्यवंशीचं शतक फेल, पराभवाच्या दाढेतून मॅच खेचली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एका बिहारीवर महाराष्ट्र भारी पडला आहे.कारण महाराष्ट्राने हा सामना 3 विकेटस राखून जिंकला आहे.या विजयात महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉने मोलाची भूमिका बजावली आहे.
Vaibhav Suryvanshi News : 'एक बिहारी सब पे भारी' असे नेहमी बोलले जाते. पण या सामन्यात महाराष्ट्र संघ आणि कर्णधार पृथ्वी शॉ बिहारवर भारी पडला आहे. कारण बिहारकडून वैभव सुर्यवंशीने नाबाद वादळी शतक ठोकलं होतं. या शतकानंकर बिहारने सन्मानजनक धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे बिहार सामना जिंकेल असे वाटत होते.पण महाराष्ट्राने हा सामना 3 विकेटस राखून जिंकला आहे.या विजयात महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉने मोलाची भूमिका बजावली होती.
खरं तर या सामन्यात बिहारने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट गमावून 176 धावा केल्या होत्या.त्यामुळे महाराष्ट्रासमोर 177 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राकडून पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी सलामीला उतरले होते.यावेळी महाराष्ट्राची सूरूवात खूपच खराब झाली होती.कारण अर्शिन कुलकर्णी 1 वर आणि मंदार भंडारी 4 धावांवर बाद झाला होता.
advertisement
त्यानंतर कर्णधार पृथ्वी शॉ आणि निरज जोशीने महाराष्ट्राचा डाव सावरला होता. या दरम्यान पृथ्वी शॉने 30 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले होते. त्याच्यासोबत निरज जोशी 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर रणजीत निकम 27 तर निखिल नाईकने 22 धावांची खेळी केली होती. तसेच योगेश डोंगरे 14 धावा केल्या होत्या. शेवटी विकी ऑस्टवलच्या 3 आणि जलज सक्सेनाच्या 8 धावांच्या खेळीने महाराष्ट्राने हा सामना 3 विकेटसने जिंकला.
advertisement
या आधी प्रथम फलंदाजी करताना बिहारकडून बिपिन सौरभ आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले होते.यावेळी बिपीन सौरभ अवघ्या 4 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर पियुश सिंह देखील 7 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर वैभल सुर्यवंशीने एकट्याने बिहारचा डाव सावरला होता. या दरम्यान आकाश राजने 26 धावांची तर आयुष लोहारूकाने 25 धावांची नाबाद खेळी केली.या दरम्यान वैभव सूर्यवंशीने 61 बॉलमध्ये नाबाद 108 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 7 चौकार मारले होते.
advertisement
वैभव सूर्यवंशीच्या या खेळीने बिहारने 3 विकेट गमावून 176 धावा केल्या होत्या. या धावा करून बिहार जिंकेल असे वाटत होते. पण पृथ्वी शॉच्या वादळी खेळीने संपूर्ण मॅच फिरली आहे आणि महाराष्ट्राने हा सामना 3 विकेटस राखून जिंकला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryvanshi : एका बिहारीवर महाराष्ट्र भारी! पृथ्वीच्या वादळी खेळीसमोर वैभव सुर्यवंशीचं शतक फेल, पराभवाच्या दाढेतून मॅच खेचली


