Delhi Blast : तीन किलोमीटरचं अंतर, 10 मिनिटाचा फरक; गाडीने यु-टर्न घेतला अन् थोडक्यात बचावले क्रिकेटर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ranji Cricket Team Narrowly Escape : स्टेडियम आणि लाल किल्ल्याचे ठिकाण केवळ काही मिनिटांच्या अंतरावर म्हणजेत 3 किलोमीटरवर आहे. 10 मिनिटाच्या फरकाने क्रिकेटर्स वाचले.
Ranji Cricket Team, Delhi Blast : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बॉम्ब स्फोटाने हादरली. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सिग्नलवर मोठा स्फोट झाल्याने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आकडा वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तविली जातीये. अशातच ज्यावेळी हा स्फोट झाला त्याच्या अवघ्या 40 मिनिटांपूर्वीच दिल्ली (Delhi Ranji Team) आणि जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) या दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अरुण जेटली स्टेडियममधून आपापल्या हॉटेलकडे निघाले होते.
स्टार क्रिकेटपटूंसोबत मोठा अनर्थ टळला
अंदाजे 5:10 च्या आसपास टीमची बस हॉटेलकडे निघाली होती. तर त्याच रोडवरून स्फोट घेऊन आलेली कार 5 वाजून 20 मिनिटाने पार झाली. स्टेडियम आणि लाल किल्ल्याचे ठिकाण केवळ काही मिनिटांच्या अंतरावर म्हणजेत 3 किलोमीटरवर असल्याने हा अपघात आणखी काही मिनिटांनी झाला असता तर दोन्ही संघातील खेळाडू आणि स्टार क्रिकेटपटूंसोबत मोठा अनर्थ घडला असता.
advertisement
यू-टर्न घेत लोअर सुभाष मार्गाकडे कार
कारचा स्फोट होण्याआधी सदर ह्युंडाइ i20 कार सुनहेरी मशीदजवळील पार्किंगमध्ये जवळपास 3 तास उभी होती. ही पार्किंग स्फोट झालेल्या जागेजवळच होती. सोमवारी संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास दर्यागंज मार्केट परिसरातून निघताना दिसली. त्यानंतर कार सुनहेरी मशीदजवळील पार्किंगमध्ये दिसली. सायंकाळी 6.22 वाजताच्या सुमारास पार्किंगमधून कार छट्टा रेल चौकात यू-टर्न घेत लोअर सुभाष मार्गाकडे जातानाही कॅमेऱ्यांनी कैद केली. त्यानंतर मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळच्या सिग्नलजवळ आल्यावर कारचा स्फोट झाला. अशातच आता अरूण जेठली स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
advertisement
आत्मघाती हल्ला केल्याचा संशय
दरम्यान, या प्रकरणात मोहम्मद उमर आणि तारिक अशी संशयितांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटांसाठी वापरलेली i-20 कार तारिकच्या नावावर होती. मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय समोर येत आहे. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 12, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Delhi Blast : तीन किलोमीटरचं अंतर, 10 मिनिटाचा फरक; गाडीने यु-टर्न घेतला अन् थोडक्यात बचावले क्रिकेटर!


