Ranji Trophy : अर्जुनची गोलंदाजीत कमाल, तरी पंजाबने गेम फिरवला, पहिल्या दिवशी किती धावा?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रणजी ट्रॉफीमध्ये आज गोवा विरूद्ध पंजाब या दोन संघात सामना पार पडला.या सामन्याच्या पहिल्याच दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त गोलंदाजी केली आहे.
Ranji Trophy 2025-26 : रणजी ट्रॉफीमध्ये आज गोवा विरूद्ध पंजाब या दोन संघात सामना पार पडला.या सामन्याच्या पहिल्याच दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त गोलंदाजी केली आहे.या गोलंदाजीनंतर पंजाबने गेम फिरवला आहे आणि पहिल्या दिवसाच्या शेवटी 5 विकेट गमावून 215 धावा केल्या आहेत. पंजाबकडुन कर्णधार उदय सहरनने नाबाद शतकीय खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर पंजाबचा डाव सावरला आबहे.
गोवा 2025-26 रणजी ट्रॉफी हंगामातील तिसरा सामना पंजाबविरुद्ध खेळत आहे.पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर 5 बाद 215 धावा केल्या. उदय सहारन सध्या शतक झळकावून क्रिजवर आहे, तर सलील अरोरा अर्धशतक झळकावल्यानंतर खेळत आहे.
पंजाबविरुद्धच्या पहिल्या डावात अर्जुन तेंडुलकरने 17 षटकांत 58 धावा देत एक विकेट घेतली होती. वासुकी कौशिक आणि मोहित रेडकरने प्रत्येकी एक विकेट घेतली, तर दीपराज गावकरने पहिल्या दिवशी दोन विकेट घेतल्या. अर्जुन तेंडुलकरला सी. प्रभुदेसाईच्या चेंडूवर रमणदीप सिंगने 22 धावांवर झेलबाद केले.
advertisement
पहिल्या दिवशी उदय सहारनने पंजाबकडून शतक झळकावले आणि नाबाद राहिला. त्याने 247 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. याशिवाय सलील अरोरा यानेही पहिल्या दिवशी नाबाद 51 धावा केल्या आणि तो अजूनही क्रीजवर आहे. पंजाबचा सलामीवीर हरनूर सिंगने 9 धावा केल्या तर प्रभसिमरन सिंगने 17 धावा केल्या. नामंधीर आणि नेहल वधेरा यांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली नाही आणि दोघांनीही प्रत्येकी 4 धावा केल्या.
advertisement
गोवा संघ : स्नेहल कौठणकर (कर्णधार),ललित यादव,समर श्रावण दुभाषी (विकेटकिपर),दर्शन मिसाळ,सुयश प्रभुदेसाई,मंथन खुटकर,दीपराज गावकर, मोहित रेडकर,अभिनव तेजराना,अर्जुन तेंडुलकर,वासुकी कौशिक
पंजाबचा संघ : हरनूर सिंग,प्रभसिमरन सिंग,नमन धीर,नेहल वढेरा,प्रीत दत्ता,सलील अरोरा ,आयुष गोयल,उदय सहारन (कर्णधार),क्रिश भगत,रमणदीप सिंग,मयंक मार्कंडे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 10:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : अर्जुनची गोलंदाजीत कमाल, तरी पंजाबने गेम फिरवला, पहिल्या दिवशी किती धावा?


