Rohit Sharma : ये कब सुधरेगा! रोहित शर्मा बसमध्येच विसरला महागडी वस्तू, पाहा काय? एअरपोर्टवरचा Video व्हायरल!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Viral Video : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा त्याच्या विसरण्याच्या भूमिकेत अजूनही खेळत आहे. त्याची प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Rohit Sharma habit of forgetting : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका झाल्यानंतर आता वनडे मालिका खेळवली जात आहे. पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. आता दोन्ही संघ सोमवारी रायपूरमध्ये दाखल झाले. दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ मंगळवारी सराव करणार आहेत. अशातच आता रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियाावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपली जुनी सवय विसला नाही. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा विसरला महागडी वस्तू
रोहित शर्मा विमानतळावर आरामात बसला होता तेव्हा सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने त्याच्याकडे येऊन त्याची मौल्यवान वस्तू परत केली. रोहित आश्चर्यचकित झाला आणि नंतर त्याला आपण पुन्हा विसरलोय, हे लक्षात आल्यावर त्याने लगेच सपोर्ट स्टाफमधील सदस्याचे आभार मानले. ही वस्तू म्हणजे त्याचे महागडे इअरबड्स होते. रोहित शर्मा बसमध्येच महागडे इअरबड्सच्या मोकळा डब्बा विसरला होता. इअरबड्स रोहित शर्माच्या कानात होते, मात्र त्याचा डब्बा मात्र हिटमॅन विसरला.
advertisement
रोहित शर्माची विसरण्याची गोष्ट काही नवी नाही. टीम इंडियाच्या सदस्यांना याची चांगलीच सवय झाली आहे. मात्र, रोहितचे इअरबड्सची डब्बी विसरल्याने रविंद्र जडेजाला हसू आवरलं नाही. तर विराटने देखील हकली स्माईल दिली.
पाहा Video
Rohit Sharma and his habit of forgetting things.
Rohit Sharma had forgotten his empty AirPods case on the bus, and at the airport a member of the support staff brought it to him. pic.twitter.com/Kp6nTXnhq9
—
advertisement
कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर झालेल्या दारुण पराभवानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या एकदिवसीय संघात पुनरागमनामुळे संघाचे मनोबल वाढले आहे. दोन्ही अनुभवी खेळाडूंनी पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची स्पुर्ती अधिक वाढल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, टीम इंडियाचा आगामी सामना येत्या 3 तारखेला रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 7:56 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : ये कब सुधरेगा! रोहित शर्मा बसमध्येच विसरला महागडी वस्तू, पाहा काय? एअरपोर्टवरचा Video व्हायरल!


