Sarfaraj Khan VIDEO : 15 बॉल 74 धावा, सरफराजने गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या, 212 च्या स्ट्राईक रेटने चोपून काढलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू आणि सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानची बॅट तळपली आहे. सरफराज खानने आसाम विरूद्ध खेळताना वादळी शतक ठोकले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 47 बॉलमध्ये त्याने हे शतक ठोकलं होतं.
Sarfaraj Khan News : टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू आणि सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानची बॅट तळपली आहे. सरफराज खानने आसाम विरूद्ध खेळताना वादळी शतक ठोकले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 47 बॉलमध्ये त्याने हे शतक ठोकलं होतं.या खेळी दरम्यान 8 चौकार आणि 7 षटकार ठोकले आहे. सरफराज खानच्या या वादळी खेळीमुळे मुंबईने 200 पार धावा केल्या आहेत.
मुंबईकडून प्रथम फलंदाजीसाठी आयुष म्हात्रे आणि अजिंक्य रहाणे उतरले होते. पण मुंबईची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण सलग दोन शतक ठोकणारा आयुष म्हात्रे आजच्या सामन्यात अवघ्या 21 धावा करून बाद झाला होता. त्याच्यानंतक अजिक्य रहाणे आणि सरफराज खानने मुंबईचा डाव सावरला होता.
🚨47 balls hundred for Sarfaraz Khan on his SMAT Return🚨
3 centuries for Mumbai players in last 3 games
pic.twitter.com/0xIWfyBC8O
— Sawai96 (@Aspirant_9457) December 2, 2025
advertisement
अजिंक्य रहाणेने या दरम्यान 42 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर सुर्यकुमार यादव मैदानात आला, पण तो 20 धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ सुर्यांश शेडगेने अवघ्या 9 धावा केल्या. आणि शेवटी साईराज पाटीलने 9 बॉलमध्ये 25 धावा काढल्या. शेवटी सर्फराज खान 100 धावा करून नाबाद राहिला होता.यावेळी सर्फराजने 7 षटकार आणि 8 चौकार मारले होते. या दरम्यान सर्फराज खानचा स्ट्राईक रेट 212 होता.
advertisement
सर्फराज खानच्या या शतकीय खेळीच्या बळावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 220 धावा केल्या आहेत.त्यामुळे आसामसमोर 221 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आसामचा डाव गडगडला आहे. आसामकडून सिबसंकर रॉयने सर्वांधिक 41 धावांची खेळी केली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 5:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sarfaraj Khan VIDEO : 15 बॉल 74 धावा, सरफराजने गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या, 212 च्या स्ट्राईक रेटने चोपून काढलं


