W,W,W... अर्जुन तेंडुलकरचा बुमराहपेक्षा घातक स्पेल, 23 कोटींच्या IPL दिग्गजानेही गुडघे टेकले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे.
कोलकाता : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. 2025-26 च्या सिझनआधी अर्जुन तेंडुलकर मुंबईची साथ सोडून गोव्याच्या टीममध्ये दाखल झाला होता. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत गोव्याकडून खेळताना अर्जुनने भेदक बॉलिंग करत मध्य प्रदेशच्या 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अर्जुनने त्याच्या स्पेलमध्ये 36 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. सुरूवातीच्या 2 ओव्हरमध्ये त्याने फक्त 5 रन दिल्या.
नव्या बॉलने बॉलिंग करत अर्जुनने पहिल्याच ओव्हरमध्ये शिवांग कुमारला आऊट करून गोव्याला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने अंकुश सिंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पुढे त्याने व्यंकटेश अय्यरचीही विकेट घेतली. व्यंकटेश अय्यरला केकेआरने मागच्या आयपीएलमध्ये 23.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण खराब कामगिरीनंतर त्याला यंदाच्या लिलावाआधी केकेआरने रिलीज केलं आहे.
advertisement
रजत पाटीदारची विकेट घेण्यातही अर्जुनचं योगदान होतं. कौशिकच्या बॉलिंगवर अर्जुनने रजत पाटीदारचा कॅच पकडला. अर्जुनच्या भेदक बॉलिंगमुळे गोव्याने मध्य प्रदेशला 20 ओव्हरमध्ये 170/6 वर रोखलं. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी गोव्याकडून अर्जुन तेंडुलकर ओपनिंगला आला, त्याने 10 बॉलमध्ये 16 रन करून जलद सुरूवात करून दिली. या खेळीमध्ये अर्जुनने 3 फोर मारल्या.
Arjun Tendulkar's performance in SMAT after traded to LSG :
Vs Chandigarh 4-0-17-3 Wickets
Vs MP 4-0-36-3 Wickets pic.twitter.com/P51IlAEEAx
— R A T N I S H (@LoyalSachinFan) December 2, 2025
advertisement
गोव्याने हे आव्हान 18.3 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून पार केलं. कर्णधार सुयश प्रभुदेसाईने 50 बॉलमध्ये नाबाद 75 रन ठोकून गोव्याचा विजय निश्चित केला. या स्पर्धेत अर्जुनने आतापर्यंत 7.70 च्या इकोनॉमी रेटने 6 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 120 च्या स्ट्राईक रेटने 65 रन केल्या आहेत. याआधी चंडीगढविरुद्धच्या सामन्यातही अर्जुनने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
आयपीएल 2026 च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपरजाएंट्सकडे ट्रेड केलं आहे, त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊकडून खेळताना दिसणार आहे.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
December 02, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
W,W,W... अर्जुन तेंडुलकरचा बुमराहपेक्षा घातक स्पेल, 23 कोटींच्या IPL दिग्गजानेही गुडघे टेकले!


