Smriti Mandhana : सांगलीची मुलगी होणार इंदूरची सून, स्मृतीच्या लग्नाची पत्रिका पाहिली का? तारीखही ठरली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. स्मृती मंधानाचं लग्न संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणार आहे.
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या महिला टीममध्ये दोन टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली मॅच शुक्रवारपासून सुरू झाली आहे. हा सामना सुरू असतानाच टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. स्मृती मंधानाचं लग्न संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या पत्रिकेवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
स्मृती मंधानाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालेली असली, तरी या पत्रिकेच्या सत्यतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्मृतीच्या लग्नाची पत्रिका डिजिटली मॉर्फ केलेली किंवा बनावट असू शकते, अशा शंकाही काही चाहत्यांनी उपस्थित केल्या आहेत.

स्मृती मंधानाच्या एका चाहत्याने तिच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आणि काही वेळातच ही पत्रिका व्हायरल झाली. पत्रिका व्हायरल होत असली तरी स्मृती मंधाना किंवा पलाश मुच्छल या दोघांनीही त्यांच्या अकाउंटवरून लग्नाबद्दल कोणतीही पोस्ट केलेली नाही. काही दिवसांपूर्वी, पलाशने त्याच्या गावी इंदूर येथे एका कार्यक्रमात या चर्चांना उत्तर देताना म्हटले होते की 'स्मृती लवकरच इंदूरची सून होईल, आणि मला आत्ता एवढेच सांगायचे आहे.'
advertisement
Queen Smriti Mandhana is getting married on November 20! pic.twitter.com/t3NYbNdUV0
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) November 14, 2025
काही चाहते स्मृती पलाशच्या लग्नाची तारीख 20 नोव्हेंबर सांगत आहेत, तर काहींनी 23 नोव्हेंबरला दोघांचं लग्न असल्याचं सांगितलं आहे. पण स्मृती आणि पलाश विवाहबंधनात कधी अडकणार? हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 10:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : सांगलीची मुलगी होणार इंदूरची सून, स्मृतीच्या लग्नाची पत्रिका पाहिली का? तारीखही ठरली!


