Solapur Crime : 12 वर्षीय मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, शेतकऱ्याच्या युक्तीने झाला होता खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur teacher sentenced to life imprisonment : मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव धनाजी सोपान इंगळे असे आहे. आरोपी शिक्षक इंगळे याने 14 एप्रिल 2023 रोजी शाळेत गेलेल्या पीडितेवर अत्याचार केला होता
Solapur Crime News : सोलापूर येथील एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल दोन वर्षांच्या तपासानंतर लागला असून, सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी आरोपी शिक्षकास कठोर शिक्षा दिली आहे. या निर्णयामुळे पीडित मुलीला न्याय मिळाला आहे.
शाळेत गेलेल्या पीडितेवर अत्याचार
मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव धनाजी सोपान इंगळे असे आहे. आरोपी शिक्षक इंगळे याने 14 एप्रिल 2023 रोजी शाळेत गेलेल्या पीडितेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात फक्त एकच नाही, तर चार ते पाच पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली होती.
शाळेजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले
advertisement
या प्रकरणाचा खुलासा एका वेगळ्या पद्धतीने झाला. शाळेजवळील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशीही आरोपी शिक्षक इंगळे याने एका पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला.
व्हिडिओ पुराव्यामुळे आरोपीला शिक्षा
या प्रकरणाचा तपास करताना, पीडिता आणि तिच्या नातेवाईकांनी सुरुवातीला पोलिसांना जबाब दिला नाही. मात्र, घटनेच्या वेळी लावलेल्या व्हिडिओ पुराव्यामुळे आरोपीला शिक्षा झाली. याबद्दल मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये पीडितेने तक्रार दाखल केली होती आणि त्याच तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
चूक झाली मला माफ करा
दरम्यान, शेतकऱ्याने माझ्याकडे असल्याचे म्हटल्यावर इंगळे याने स्वतःहून ‘चूक झाली मला माफ करा’ अशी विनवणी केली. मुलींना विश्वासात घेऊन विचारल्यावर त्या शिक्षकाने तीन-चार मुलींसमवेत असे कृत्य केल्याची बाब समोर आली. त्यातील एका पालकाने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी तपास केला होता.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 14, 2025 9:09 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Solapur Crime : 12 वर्षीय मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, शेतकऱ्याच्या युक्तीने झाला होता खुलासा!


