Suryakumar Yadav : नव्या फॉर्म्युलासह टीम इंडिया खेळणार टी-20 वर्ल्ड कप, सूर्याने सांगितलं संजूला मिडल ऑर्डरला का खेळवलं?

Last Updated:

Suryakumar Yadav On Sanju Samson : शुभमन गिल आणि संजू सॅमसन आमच्या संघाची ताकद आहेत. त्या दोघांना खेळताना पाहणं आनंददायी असतंय. दोघं त्यांचा रोल चांगल्या प्रकारे निभावत आहेत, असं सूर्यकुमार म्हणाला.

Suryakumar Yadav On Sanju Samson
Suryakumar Yadav On Sanju Samson
Suryakumar Yadav On batting combination : आजपासून भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात टी-ट्वेंटी मालिका खेळवला जाणार आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने पाच सामन्यांची ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरेल. अशातच आता संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरवर मोठं वक्तव्य केलंय. तर संजूला मिडल ऑर्डरला का पाठवलं? याचं कारण देखील सूर्यकुमार यादव याने दिलंय. त्याचबरोबर सूर्याने टीम इंडियाचा नवा फॉर्म्युला देखील शेअर केलाय.

श्रीलंका दौऱ्यात संजूला आम्ही....

संजू बद्दल बोलायचं झालं तर, तो जेव्हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आला तेव्हा त्याला ओपनिंगची संधी मिळाली. पण आता ओपनिंगची संधी गेली आहे. शुभमनला ओपनिंगमध्ये खेळत आहे. संजूने ओपनिंग करत असताना खूप चांगली कामगिरी केलीये. पण श्रीलंका दौऱ्यात शुभमन गिल ओपनिंगला आल्यावर संजूला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि संजू कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार झाला. खेळाडू कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार असल्याचं पाहून नक्कीच आनंद झाला, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

आमच्या संघाची ताकद...

तीन नंबरच्या खेळाडूपासून ते सहानंबरच्या खेळा़डूपर्यंत मी सगळ्यांना सांगितलंय की, तुम्ही कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी फ्लेक्झिबल असलं पाहिजे. सलामीवीर खेळाडू सोडून.., असं म्हणत सूर्यकुमारने नवा फॉर्म्युला सांगितला आहे. शुभमन गिल आणि संजू सॅमसन आमच्या संघाची ताकद आहेत. त्या दोघांना खेळताना पाहणं आनंददायी असतंय. दोघं त्यांचा रोल चांगल्या प्रकारे निभावत आहेत. एक ओपनिंग करेल आणि दुसरा मिडल ऑर्डरमध्ये खेळेल, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

शुभमनमुळे संजूची कोंडी

दरम्यान, बीसीसीआयने शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन म्हणून जाहीर केलं आहे. त्यामुळे शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणं जमणार नाही. त्यामुळे शुभमनसाठी ओपनिंगचा स्लॉट उपलब्ध असणार आहे. याचा फटका संजू सॅमसनला बसला आहे. संजूची शुभमनमुळे घसरगुंडी झाली असून तो आता मिडल ऑर्डरमध्ये खेळताना दिसतोय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : नव्या फॉर्म्युलासह टीम इंडिया खेळणार टी-20 वर्ल्ड कप, सूर्याने सांगितलं संजूला मिडल ऑर्डरला का खेळवलं?
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement