T20 World Cup : घरी जाता जाता ऑस्ट्रेलियाची 'तबाही', 9 ओव्हरमध्येच लावला मॅचचा निकाल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं, त्यामुळे लाज वाचवण्यासाठी कांगारू टीम मैदानात उतरली होती.
पल्लेकेले : टी-20 वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया त्यांची ओमानविरुद्धची शेवटची मॅच खेळण्याच्या आधीच स्पर्धेबाहेर झाली होती, त्यामुळे लाज वाचवण्यासाठी कांगारू टीम मैदानात उतरली होती. ओमानविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने धमाका उडवून दिला आहे. ओमानने दिलेलं 105 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त 9.4 ओव्हरमध्येच पार केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅविस हेड या दोन्ही ओपनरनी 8.1 ओव्हरमध्ये 93 रनची पार्टनरशीप केली. मार्शने 33 बॉलमध्ये 193.94 च्या सरासरीने नाबाद 64 रन केल्या ज्यात 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर हेडने 19 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीने 32 रन केल्या. जॉश इंग्लिस 6 बॉलमध्ये 12 रनवर नॉट आऊट राहिला. ओमानकडून शकील अहमद याला एकमेव विकेट मिळाली.
advertisement
या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि ओमानला 16.2 ओव्हरमध्ये 104 रनवर ऑलआऊट केलं. लेग स्पिनर ऍडम झम्पाने 3.2 ओव्हरमध्ये 21 रन देऊन 4 विकेट घेतल्या. याशिवाय झेवियर बार्टलेट आणि ग्लेन मॅक्सवेलला 2-2 विकेट मिळाल्या. मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन एलिस यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. ओमानकडून वसीम अली याने सर्वाधिक 32 रन केले.
advertisement
सुपर-8 चा थरार
ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यातल्या या मॅचसोबतच टी-20 वर्ल्ड कपचे ग्रुप स्टेजचे सामने संपले आहेत. शनिवार 21 फेब्रुवारीपासून सुपर-8 स्टेजला सुरूवात होणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या 8 टीम सुपर-8 साठी क्वालिफाय झाल्या आहेत. सुपर-8 चा पहिला सामना शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तर टीम इंडिया रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळेल.
advertisement
सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4-4 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. पहिल्या ग्रुपमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या टीम आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका आहेत. सुपर-8 च्या 2 ग्रुपमधल्या प्रत्येकी दोन-दोन टॉपच्या टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. यानंतर सेमी फायनलमध्ये विजय मिळवलेल्या टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 10:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : घरी जाता जाता ऑस्ट्रेलियाची 'तबाही', 9 ओव्हरमध्येच लावला मॅचचा निकाल!









