T20 World Cup : एक मुलगा टीम इंडियात, दुसरा आफ्रिकेच्या संघात... सुपर-8 च्या सामन्याआधी आई धर्मसंकटात!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये रविवारी टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात एक भाऊ टीम इंडियामध्ये तर दुसरा दक्षिण आफ्रिकेच्या संघात असणार आहे.
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये रविवारी टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात एक भाऊ टीम इंडियामध्ये तर दुसरा दक्षिण आफ्रिकेच्या संघात असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी अनेकदा दोन भाऊ एकाच टीमकडून खेळताना अनेकांनी पाहिलं आहे, पण दोन भाऊ एकमेकांविरोधात खेळत असल्याचा दुर्मिळ योगायोग रविवारी पाहायला मिळणार आहे.
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर-8 चा हा सामना रंगेल. या सामन्यात टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये मॉर्नी मॉर्कल तर दक्षिण आफ्रिकेच्या डग आऊटमध्ये एल्बी मॉर्कल दिसतील. मॉर्न मॉर्कल हा टीम इंडियाचा बॉलिंग कोच आहे तर एल्बी मॉर्कल टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेचा विशेष सल्लागार आहे. आता मॉर्ने मॉर्कलला पाठिंबा द्यायचा का एल्बी मॉर्कलला या धर्मसंकटात त्यांची आई सापडली आहे.
advertisement
'आम्ही एकमेकांसोबत बोलत नाही, मला वाटते माझ्या आईला आमच्या दोघांपेक्षा जास्त काळजी असेल. तिला माहिती नाही की भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यात कुणाला पाठिंबा द्यायचा', अशी प्रतिक्रिया एल्बी मॉर्कलने दिली आहे.
काय म्हणाला मॉर्ने मॉर्कल?
'मी त्याला मैदानावर येताना पाहिलं, पण आम्ही जास्त बोलत नाही. त्याला पाहून छान वाटलं', असं मॉर्ने मॉर्कल म्हणाला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच भाऊ एकाच टीमकडून खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाचे ग्रेग चॅपल, इयन चॅपल, स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ, भारताकडून मोहिंदर अमरनाथ, सुरिंदर अमरनाथ आणि राजिंदर अमरनाथ, इरफान पठाण आणि युसूफ पठाण, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, न्यूझीलंडकडून रिचर्ड हेडली आणि डेल हेडली, हे भाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र खेळले.
advertisement
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन भाऊ वेगवेगळ्या टीममध्ये असल्याची घटनाही घडली. ऑलराऊंडर सॅम करन हा इंग्लंडकडून खेळत आहे, तर त्याचा भाऊ बेन करन याची झिम्बाब्वेच्या टीममध्ये निवड करण्यात आली. ब्रेंडन टेलरला दुखापत झाल्यामुळे बेन करनला झिम्बाब्वेकडून संधी मिळाली. मॉर्ने मॉर्कल आणि एल्बी मॉर्कल हे दक्षिण आफ्रिकेकडून एकत्र खेळले, पण आता हे दोघं विरोधी टीमच्या डग आऊटमध्ये दिसतील.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
Feb 20, 2026 11:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : एक मुलगा टीम इंडियात, दुसरा आफ्रिकेच्या संघात... सुपर-8 च्या सामन्याआधी आई धर्मसंकटात!








