VIDEO : 'तुझी पण सेंच्युरी पक्की होती...', एकाच वाक्यात विराटने केली अर्शदीपची बोलती बंद!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli shuts down Arshdeep singh talk : किंग कोहलीने रीलमध्ये अर्शदीपला असे काही सांगितले ज्यामुळे अर्शदीपच्या अंगलट आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli Viral Video : विशाखापट्टणममध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 270 धावा केल्या होत्या, यशस्वी जयस्वालचे शतक आणि विराट कोहलीच्या 45 बॉलमध्ये 65 धावांच्या जलदगती खेळीमुळे भारताने सहज लक्ष्य गाठलं. टीम इंडियासाठी अर्शदीप अन् कुलदीप यादवची बॉलिंग इफेक्टिव ठरली. अशातच आता अर्शदीपचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराटने एकाच वाक्यात अर्शदीपची बोलती बंद केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
किंग कोहलीने रील व्हायरल
अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेक मीम्स शेअर करतो. यावेळी त्याने विराट कोहलीसोबत एक मीम बनवण्याचा प्रयत्न केला, पण किंग कोहलीने रीलमध्ये त्याला असे काही सांगितले ज्यामुळे अर्शदीपच्या अंगलट आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं? पाहा
advertisement
Arshdeep shocked Virat Bhai Rocked
Kohli to Arshdeep "Toss jeet Gaye warna teri bhi Century pakki thi dew mein". pic.twitter.com/4Wt9ziiViU
— Pics of Cricket (@spincrick) December 7, 2025
आज शतक तर निश्चित होतं...
विराट पाजी, आज रन्स कमी होत्या, नाहीतर आज शतक तर निश्चित होतं, असं अर्शदीप म्हणताना दिसला. त्यावर विराटने काहीही विचार न करता अर्शदीपला रोस्ट केलं. विराटने एका वाक्यात विषय संपवला. बेटा आज नशिबाने टॉस जिंकलो, नाहीचर दवामुळे तुझंही शतक झालं असतं, असं विराट कोहली म्हणाला.
advertisement
विराट कोहली काय म्हणाला?
खरं सांगायचं तर, या मालिकेत मी ज्या पद्धतीने खेळलो आहे ती माझ्यासाठी सर्वात समाधानकारक गोष्ट आहे. गेल्या २-३ वर्षात मी या पातळीवर खेळलो आहे असे मला वाटत नाही. मला माहित आहे की जेव्हा मी मध्यभागी अशी फलंदाजी करू शकतो तेव्हा ते निश्चितच संघाला खूप मदत करते कारण मी बराच काळ फलंदाजी करू शकतो, मी परिस्थितीनुसार फलंदाजी करू शकतो, असं विराट कोहली मॅचनंतर म्हणाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 9:46 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'तुझी पण सेंच्युरी पक्की होती...', एकाच वाक्यात विराटने केली अर्शदीपची बोलती बंद!


