VIDEO : वैभव सुर्यवंशीची त्सुनामी, 32 बॉलमध्ये आशिया कपमध्ये ठोकली सेंच्यूरी, 42 बॉलमध्ये 144 धावा

Last Updated:

वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली आहे. युएईविरूद्ध खेळताना त्याने 32 बॉलमध्ये वादळी शतक ठोकलं आहे.या शतकाच्या बळावर त्याने धावसंख्या 250 धावांच्या पार नेली आहे.

vaibhav Suryavanshi
vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi News : भारताची सिनिअर टीम कोलकत्तामध्ये साऊथ आफ्रिकेविरूद्ध टेस्ट सामने खेळते आहे, तर दुसरीकडे भारताचा अ संघ आशिया कप रायझिंग स्टार 2025-26 ही स्पर्धा खेळते आहे.या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली आहे. युएईविरूद्ध खेळताना त्याने 32 बॉलमध्ये वादळी शतक ठोकलं आहे.या शतकाच्या बळावर त्याने धावसंख्या 250 धावांच्या पार नेली आहे.
advertisement
आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत आज भारताचा सामना युएईविरूद्ध सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.वैभवने पहिल्यांदा 17 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं.त्यानंतर त्याने पुढे जाऊन 32 बॉलमध्ये आपलं शतक पुर्ण केलं होतं. शतकानंतरही तो थांबला नाही त्याच ताकदीने खेळत राहिला. अशाप्रकारे तो 42 बॉलमध्ये तो 144 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्याने 15 षटकार आणि 11 चौकार लगावले होते. अशाप्रकारे त्याने एकट्याने 342 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.
advertisement
advertisement
वैभव पाठोपाठा कर्णधार जितेश शर्माने देखील जबरदस्त फलंदाजी केली आहे. जितेश शर्माने 32 बॉलमध्ये 83 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले होते. या दोन्ही खेळाडूंच्या वादळी खेळीच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 297 धावा ठोकल्या आहेत.
advertisement
युएईकडून मोहम्मद फराजुद्दीन आणि आर्यन अफजल खान,मुहम्मद अरफाने प्रत्येकी एक विकेट काढली आहे. युएईसमोर आता 298 धावांचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य आता युएई गाठते की टीम इंडिया त्यांना ऑल आऊट करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : वैभव सुर्यवंशीची त्सुनामी, 32 बॉलमध्ये आशिया कपमध्ये ठोकली सेंच्यूरी, 42 बॉलमध्ये 144 धावा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement