IND vs SA : 14 वर्षाच्या वैभवकडून 25 वयाच्या अभिषेकचा रेकॉर्ड ब्रेक, अय्यरचा विक्रम मोडता मोडता राहिला

Last Updated:

वैभव सूर्यवंशीने अभिषेक शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे. यासोबत त्याला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती.पण हा अय्यरचा विक्रम मोडायचा त्याच्याकडून राहुन गेला आहे.

vaibhav suryavanshi break abhishek sharma record
vaibhav suryavanshi break abhishek sharma record
Vaibhav Suryavanshi Break Abhishek Sharma Record : आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेत टीम इंडियाच्या वैभव सुर्यवंशीने 42 बॉलमध्ये 144 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 15 षटकार आणि 11 चौकार लगावले होते.अशाप्रकारे त्याने एकट्याने 342 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या होत्या. ही खेळी करून त्याने आता अभिषेक शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे. यासोबत त्याला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती.पण हा अय्यरचा विक्रम मोडायचा त्याच्याकडून राहुन गेला आहे.
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या कोणत्याही भारतीय वंशाच्या फलंदाजाने केलेली ही चौथी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. वैभव आता अभिषेक शर्माला मागे टाकत टी20 क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला आहे.यासोबत तो तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या यादीतही सामील झाला आहे.
भारतासाठी सर्वाधिक टी20 डाव खेळणारे फलंदाज
तिलक वर्मा - 151(51), हैदराबाद विरुद्ध मेघालय, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024
advertisement
श्रेयस अय्यर - 147(55),मुंबई विरुद्ध सिक्कीम, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2019
पुनित बिश्त - 146(51),मेघालय विरुद्ध मिझोराम, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021
वैभव सूर्यवंशी - 144(42), इंडिया अ विरुद्ध युएई, आशिया कप रायझिंग स्टार्स 2025
अभिषेक शर्मा - 141(55),सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, आयपीएल 2025`
पंतची साधली बरोबरी
वैभव सुर्यवंशीची ही टी20 करीअरमधलं सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वी, त्याने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी 35 चेंडूत शतक झळकावले होते. वैभवने टी20 क्रिकेट इतिहासातील संयुक्त चौथे सर्वात जलद शतक झळकावले आणि 2018 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध दिल्लीकडून खेळताना 32चेंडूत शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतच्या बरोबरीची बरोबरी केली आहे.
advertisement
वैभवची वादळी खेळी
आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत आज भारताचा सामना युएईविरूद्ध सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.वैभवने पहिल्यांदा 17 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं.त्यानंतर त्याने पुढे जाऊन 32 बॉलमध्ये आपलं शतक पुर्ण केलं होतं. शतकानंतरही तो थांबला नाही त्याच ताकदीने खेळत राहिला. अशाप्रकारे तो 42 बॉलमध्ये तो 144 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्याने 15 षटकार आणि 11 चौकार लगावले होते. अशाप्रकारे त्याने एकट्याने 342 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 14 वर्षाच्या वैभवकडून 25 वयाच्या अभिषेकचा रेकॉर्ड ब्रेक, अय्यरचा विक्रम मोडता मोडता राहिला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement