IND vs SA 2nd ODI : ड्रेसिंग रुममध्ये वाद, एअरपोर्टवर सिलेक्टर्ससोबत विराटची सिक्रेट मिटिंग; टीम इंडियामध्ये चाललंय काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat kohli With National Selector At Airport : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वाद समोर आल्यानंतर बीसीसीआयचा नॅशनल सिलेक्टर एअरपोर्टवर दिसून आला.
Virat Kohli Viral Video : साऊथ अफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडी घेतली आहे. रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 17 रननी विजय झाला आहे. अशातच आता उर्वरित दोन वनडे सामन्याआधी ड्रेसिंग रुममधील वातावरण तापलं आहे. अशातच आता रांची एअरपोर्टवरचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया देखील उचावल्या आहेत.
गौतमची बीसीसीआयसोबत बैठक?
काही मीडिया रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि इतर अनेक अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टमधून समोर आली होती. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबद्दल सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. दोघेही गेल्या काही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करून फॉर्ममध्ये परतले आहेत.
advertisement
प्रज्ञान ओझाची एअरपोर्टवर एन्ट्री
अशातच आता रांची एअरपोर्टवर टीम इंडिया रायपूरसाठी रवाना होत असताना टीम इंडियाचा नॅशनल सिलेक्टर प्रज्ञान ओझा याने भारतीय खेळाडूंची भेट घेतली. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यासह त्याने खास बोलणं केलं. यावेळी विराट कोहलीसोबत त्याची गंभीर चर्चा झाल्याचं पहायला मिळालं. तसेच गंभीरसोबत देखील त्याचं बोलणं झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
Some serious discussion between Virat Kohli and selector pragyan Ojha. https://t.co/fS88MRytDG pic.twitter.com/UrNcMWpfx5
— (@rushiii_12) December 2, 2025
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद?
दरम्यान, रांचीमधल्या वनडेनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधले काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीर यांच्यात वाद असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत. शतक केल्यानंतर विराट ड्रेसिंग रूममध्ये आला त्यानंतर गंभीरने त्याला मिठी मारली, पण दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसलं नाही. त्यामुळे अनेकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 2nd ODI : ड्रेसिंग रुममध्ये वाद, एअरपोर्टवर सिलेक्टर्ससोबत विराटची सिक्रेट मिटिंग; टीम इंडियामध्ये चाललंय काय?


