Virat Kohli : कपाळावर टिळा, हातात पुजेची थाळी... सीरिज संपताच विराट कोणत्या मंदिरात गेला?

Last Updated:

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये धमाका केला. सीरिज संपल्यानंतर विराट कोहली मंदिरात गेला.

कपाळावर टिळा, हातात पुजेची थाळी... सीरिज संपताच विराट कोणत्या मंदिरात गेला?
कपाळावर टिळा, हातात पुजेची थाळी... सीरिज संपताच विराट कोणत्या मंदिरात गेला?
विशाखापट्टणम : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये धमाका केला. कोहलीने सीरिजमध्ये लागोपाठ 2 शतकं आणि शेवटच्या वनडेमध्ये नाबाद अर्धशतक ठोकलं. या कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. सीरिजच्या शेवटच्या सामन्यात विराटने नाबाद 65 रनची खेळी केली. विशाखापट्टणममध्ये झालेल्या शेवटच्या वनडेमधल्या विजयानंतर विराट कोहली भक्तीमध्ये लीन झालेला पाहायला मिळाला.
मॅचच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे खेळाडू आपआपल्या घरी जायला निघाले, तेव्हा विराट पांढरा कुर्ता, कपाळावर टिळा आणि हातात पुजेची थाळी घेऊन विशाखापट्टणमच्या प्रसिद्ध सिंहाचलम मंदिरामध्ये दर्शन करायला पोहोचला. भक्तीमध्ये आकंठ बुडालेल्या विराट कोहलीचा मंदिरातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे सिंहाचलम मंदिराची मान्यता?

विशाखापट्टणममधल्या सिंहाचलम मंदिरामध्ये भगवान नरसिंहाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार भक्त प्रल्हादाने नरसिंह भगवान मंदिर बनवलं. याच ठिकाणी राक्षस राजा हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी देवाने नरसिंहाचा अवतार घेतला होता, अशीही मान्यता आहे. यानंतर भक्त प्रल्हादाने भगवान नरसिंहाचा क्रोध शांत करण्यासाठी त्याच्यावर चंदनाचा लेप लावला होता. याच कारणामुळे सिंहाचलम मंदिरामध्ये नरसिंहाच्या मूर्तीवर वर्षभर चंदनाचा लेप लावला जातो.
advertisement

सीरिजमध्ये विराटची धमाकेदार कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. विराटने रांची वनडेमध्ये 135 रनची खेळी केली, यानंतर रायपूरमध्ये त्याने 103 रन केले होते. लागोपाठा दोन शतकं केल्यानंतर विशाखापट्टणमच्या तिसऱ्या वनडेमध्येही विराटची बॅट तळपली. सीरिजच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विराटने नाबाद 65 रनची खेळी केली. या वनडे सीरिजनंतर आता विराट विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : कपाळावर टिळा, हातात पुजेची थाळी... सीरिज संपताच विराट कोणत्या मंदिरात गेला?
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement