वर्धेतील 12 खेळाडूंचे राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेत घवघवीत यश; ग्रामीण भागातील मुलींनी जिंकली पदके

Last Updated:

सॅम्बो खेळ राष्ट्रीय स्पर्धेत वर्ध्यातील 12 खेळाडूंनी विजय प्राप्त केला असून विविध पदके प्राप्त आहेत. यामुळे वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : कुस्ती या खेळ प्रकारात मोडणाऱ्या सॅम्बो खेळ राष्ट्रीय स्पर्धेत वर्ध्यातील 12 खेळाडूंनी विजय प्राप्त केला असून विविध पदके प्राप्त आहेत. यामुळे वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. वर्धेत कार्यरत असलेल्या वर्धा सॅम्बो असोसिएशनच्या दोन खेळाडूंनी मागील वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त केली. तर या वर्षी 26 ते 28 जानेवारी 2024 ला राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वर्धेतील 12 खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत भारतातील वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते.
advertisement
मुलींनीही मारली बाजी 
सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करत विविध पदक प्राप्त केले आहेत. यात मुलींची बाजी बघायला मिळाली असून ग्रामीण भागातील मुलींनी सुवर्ण रजत आणि कांस्यपदक प्राप्त केलं आहे. यात वर्ध्याच्या अत्यंत ग्रामीण भागातील आदिवासी समाजाची खेळाडू दीपाली धुर्वे हिने कांस्य पदक प्राप्त केले आहे.
कुठे गायब आहे क्रिकेटर इशान किशन? राहल द्रविड यांचं सुद्धा ऐकलं नाही...
या यशाबद्दल बोलताना खेळाडू दीपाली धुर्वे हिने सांगितले की, माझं गाव बांगडापूर हे अत्यंत ग्रामीण भागात असून इथे वाघाची सतत दहशत असते. अशात मी अभ्यास आणि खेळाच्या सरावा करिता एसटीने वर्ध्यात यायची तर परत जाण्यासाठी कधीकधी रात्री 9 सुद्धा वाजायचे. घरी आईवडील शेती करतात गुरे चारतात. मीही घरी घरकाम करून स्वयंपाक आणि सगळी कामे करून बाहेर पडते. मला सॅम्बो खेळाची आवड निर्माण झालेली आहे. कोच विक्रांत गव्हाणे आणि महावीर वरहारे यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून आत्मविश्वास दिला. त्यामुळे मी हे यश गाठलं असून या स्पर्धेत मी कांस्यपदक प्राप्त केलं असल्याचं दीपाली सांगते.
advertisement
मयुरीने पटकावलं रजत पदक 
सोबतच मयुरी देहारे या खेळाडूने देखील रजत पदक प्राप्त केले आहे. मयुरी देखील कारला या गावातून येते आणि ग्राउंड वर प्रॅक्टिस करून सॅम्बो साठी वेळ देते. या खेळात मुलींना बऱ्याचदा घरून पाठिंबा नसतो कारण कुस्ती प्रकार असल्यामुळे खूप जोखमीचा हा खेळ आहे. मात्र माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला आणि कोचेसचं मार्गदर्शन लाभलं त्यामुळे मी हे रजत पदक पटकावू शकले असल्याचं मयुरीने सांगितलं.
advertisement
अपूर्वाने गोल्ड मेडल वर मारली बाजी 
सॅम्बो कॉम्बॅट आणि स्पोर्ट्स या खेळात ग्रामीण भागातील अपूर्वा कठाने हिने (सुवर्णपदक) आणि (रजत पदक) अशी दोन पदके पटकावली आहेत. मीही अत्यंत ग्रामीण भागातली रहिवासी असून बस ने येणं जाणं करावं लागतं. त्यामुळे अनेकदा अडचणी येतात. त्यात मी या खेळात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत जिंकेल असं मला वाटलं नव्हतं. मात्र कोचेसने केलेलं मार्गदर्शन मला प्रेरणादायी होतं. त्यामुळे मी सुवर्णपदक प्राप्त करु शकली असून यापूढे येणाऱ्या राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळ स्पर्धेत आम्ही प्रचंड मेहनत घेऊन गोल्ड आणू असा विश्वास अपूर्वा आणि सर्व खेळाडूंनी व्यक्त केला.
advertisement
या खेळाडूंनी जिंकली पदके 
निखिल जुमडे (रजत पदक), शुभम घुगरे (कांस्यपदक), गजानन हज़ारे (कांस्यपदक), आयुष अग्रवाल (कांस्यपदक), राज यादव (कांस्यपदक), अक्षय वाघाङे (कांस्यपदक), वेदांत घोडमारे (कांस्यपदक), महावीर वरहारे (रजत पदक) तर विक्रांत गव्हाणे यांनी (कांस्यपदक) पदक प्राप्त केले. त्यामुळे वर्धा जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम यांनी खेळाडूंचं अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्धेतील 12 खेळाडूंचे राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेत घवघवीत यश; ग्रामीण भागातील मुलींनी जिंकली पदके
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement