IND vs SA World Cup Final : पावसानंतर शफाली-दीप्ती बरसल्या, आफ्रिकेला कितीचं टार्गेट? हरमनचा एक हात ट्रॉफीवर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने मोठा स्कोअर उभारला आहे.
नवी मुंबई : महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने मोठा स्कोअर उभारला आहे. 50 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 7 विकेट गमावून 298 रन केल्या आहेत. ओपनर शफाली वर्माने 78 बॉलमध्ये सर्वाधिक 87 रन केल्या तर दीप्ती शर्मानेही अर्धशतक केलं. 58 बॉलमध्ये 58 रन करून दीप्ती आऊट झाली. स्मृती मंधाना 45 रन करून माघारी परतली. स्मृती आणि शफाली यांच्यात 104 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरूवात मिळाली. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाला.
स्मृतीची विकेट गेल्यानंतर शफालीने जेमिमाच्या मदतीने इनिंगला आकार दिला, पण सेमी फायनलमध्ये शतक करणारी जेमिमा 24 रनवर आऊट झाली, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही 20 रनवर पॅव्हेलियनमध्ये आली. 4 विकेट गेल्यानंतर टीम इंडिया अडचणीत वाटत होती, पण दीप्ती शर्माने रिचा घोषच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. दक्षिण आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर मलाबा, नदिरे डे क्लर्क आणि च्लोई ट्रायन यांना 1-1 विकेट मिळाली.
advertisement
मागच्या 6 वर्ल्ड कप फायनलमध्ये 5 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. फायनलसारख्या तणावाच्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना आणखी तणाव येतो, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय का घेतला? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
महिलांचे आतापर्यंत 13 वनडे वर्ल्डकप झाले आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यापैकी एकही संघ फायनलमध्ये नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आज महिला क्रिकेट विश्वाला वनडेत नवा चॅम्पियन मिळणार आहे. भारत आणि द.आफ्रिकेने आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही.
advertisement
भारताचा वर्ल्डकपमधील प्रवास
श्रीलंकेविरुद्ध ५९ धावांनी विजय
पाकिस्तानविरुद्ध ८८ धावांनी विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ विकेटनी पराभव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेटनी पराभव
इंग्लंडविरुद्ध ४ धावांनी पराभव
न्यूझीलंडविरुद्ध ५३ धावांनी विजय
बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे रद्द
सेमीफायनल-ऑस्ट्रोलियाविरुद्ध ५ विकेटनी विजय
दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमधील प्रवास
इंग्लंडविरुद्ध १० विकेटनी पराभव
न्यूझीलंडविरुद्ध ६ विकेटनी विजय
भारताविरुद्ध ३ विकेटनी विजय
advertisement
बांगलादेशविरुद्ध ३ विकेटनी विजय
श्रीलंकेविरुद्ध १० विकेटनी विजय
पाकिस्तानविरुद्ध १५० धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ विकेटनी पराभव
सेमीफायनल- इंग्लंडविरुद्ध १२५ धावांनी विजय
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
November 02, 2025 8:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA World Cup Final : पावसानंतर शफाली-दीप्ती बरसल्या, आफ्रिकेला कितीचं टार्गेट? हरमनचा एक हात ट्रॉफीवर!


