Shocking Crime : ते कारण भावजीना खटकलं अन् भररस्त्यात मेव्हण्यावर ब्लेडने....; ठाण्यातील घटनेनं खळबळ

Last Updated:

Thane Crime News : ठाणे शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलेले आहे. जिथे क्षुल्लक कारणांवरुन भावजीने मेव्हण्यावर ब्लेडने वार केले आहेत.

Thane Crime news
Thane Crime news
ठाणे : घरातील क्षुल्लक वाद कोणत्या थराला कधी जाईल हे कधीच सांगता येत नाही. याचाच प्रत्यय ठाणे शहरात घडलेल्या या गुन्ह्याने आलेला आहे. जिथं शहरात सोबत येण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन भावजीने मेव्हण्यावर ब्लेडने धक्कादायक वार केले आहेत. घडलेल्या या घटनेने ठाणे शहर हादरुन गेलं आहे.
रागात घडला गंभीर गुन्हा
ठाणे शहरातील कॅसल मिल परिसरात 3 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. जिथे पीडित व्यक्ती मनोहर मोरे त्याच्या मित्रांसोबत उभा होता त्याच दरम्यान आरोपी हेमंत कडव त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. हल्ला इतक्या अचानक झाला की तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर मनोहरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. जिथे त्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.
advertisement
पोलिसांनी हल्ल्याची माहिती मिळताच राबोडी पोलिस ठाण्यात त्वरित गुन्हा दाखल केला असून आरोपी हेमंत कडव याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी साक्षीदारांची माहिती घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासात घेतले आहेत.
हल्ल्याच कारण काय?
हल्ल्याचे कारण म्हणजे फक्त सोबत येण्यास नकार देणे होते. पण यात धारदार ब्लेडचा वापरुन एखाद्यावर वार करणे ही अत्यंत भयानक आणि धक्कादायक बाब आहे. या घटनेमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking Crime : ते कारण भावजीना खटकलं अन् भररस्त्यात मेव्हण्यावर ब्लेडने....; ठाण्यातील घटनेनं खळबळ
Next Article
advertisement
Eknath Shinde Ravindra Chavan: व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय
  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

View All
advertisement