Thane : एका फोन कॉलनं होत्याचं नव्हतं! सेवानिवृत्त मॅनेजरला सव्वा कोटींचा गंडा; स्कॅमनं पोलिसही हैराण
Last Updated:
Thane Crime News : मुंबईत सेवानिवृत्त इंग्रजी वृत्तपत्राचे डेप्युटी मॅनेजर यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून नाशिकमध्ये सिमकार्ड आणि बँक खाते उघडण्यात आले. दहशतवादी संघटनांशी आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आल्याने 1.25 कोटींचा फसवणूक प्रकरण पोलिसांच्या तपासाखाली आहे.
ठाणे : इंग्रजी वृत्तपत्रातील 64 वर्षीय सेवानिवृत्त डेप्युटी मॅनेजर यांच्यावर सव्वा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. पोलिसांच्या तपासानुसार गुन्हेगारांनी मुंबईतील डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया आणि नाशिक पोलिस उपनिरीक्षक असल्याचा दावा करून त्यांना फसवले.
एका फोन कॉलनं होत्याचं नव्हतं
तक्रारदारांच्या मोबाईलवर 11 नोव्हेंबरला राजेश कुमार चौधरी यांचा फोन आला. चौधरी यांनी स्वतःला डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियातील अधिकारी म्हणून सांगितले आणि नंतर की म्हणाले त्यांचा आधारकार्ड वापरून नाशिकमध्ये कोणीतरी मोबाईल कंपनीत सीमकार्ड घेत आहे. त्या सीमकार्डचा वापर लोकांना धमकावण्यासाठी केला जात आहे, असे सांगून त्यांनी त्यांना घाबरवले. पुढे चौधरी यांनी सांगितले की त्या आधारकार्डच्या आधारावर तक्रारदारांचे नाव वापरून कॅनरा बँकेत खाते उघडले गेले आहे आणि त्या खात्यातून दहशतवादी संघटनांशी संबंधित आर्थिक व्यवहार होत आहेत.
advertisement
फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी तक्रारदारांना फंड रेग्युलरायझेशनसाठी एकूण एक कोटी 25 लाख 50 हजार 280 रुपये विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकरणी नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यात आणि नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत नोंदविलेल्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
advertisement
तपासात असे दिसून आले आहे की गुन्हेगारांनी सेवानिवृत्त मॅनेजर यांच्या आधारकार्डचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली, ज्यामुळे त्या व्यक्तीला केवळ आर्थिक तोटा नाही तर मानसिक धक्का देखील बसला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 1:10 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : एका फोन कॉलनं होत्याचं नव्हतं! सेवानिवृत्त मॅनेजरला सव्वा कोटींचा गंडा; स्कॅमनं पोलिसही हैराण


