Thane News : ठाण्याचा 'रील स्टार' पुन्हा चर्चेत; इंजिनीअर तरुणीने सांगितला हादरवणारा प्रकार
Last Updated:
Shailesh Ramugade : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या रील्स स्टारवर विश्वास ठेवून इंजिनीअर तरुणीने लाखो रुपये दिले. लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने तिच्याकडून एकूण 22 लाखांची फसवणूक केली.
ठाणे : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रील्स स्टार म्हणून प्रसिद्द असणाऱ्या तरुणाला तरुणींना फसवणुकीच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली होती. त्याच प्रकरणी आता पुन्हा एकदा या तरुणाविरुद्द एका इंजिनीअर तरुणीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. पण या तरुणाने तरुणीसोबत नक्की काय केलं होतं त्या विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश रामुगडे (वय31)असे रील्स स्टार तरुणाचे नाव असून त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहे. सध्या त्यावर मुंबईतील एका आयटी इंजिनीअर तरुणीने गुन्हा दाखल केलेला आहे ज्यात त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे स्वप्न दाखवले त्यानंतर चक्क तिची 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सध्या या प्रकरणी भांडुप पोलिसांनी तरुणाविरुद्द गुन्हा नोंदवला आहे. मात्र त्याला गेल्या महिन्यात अटक केली असल्याने तो आता न्यायालयीन कोठडीत आहे.
advertisement
इथून सुरू झाली त्यांची ओळख; पुढे घडत गेले
रिल्स स्टार शैलेश विरुद्ध तक्रार दिलेली तरुणी (वय30) भांडुप परिसरात राहते. तिची शैलेशशी ओळख इंस्टाग्रामवरुन 2023मध्ये झाली होती. लाखो फॉलोअर्स असल्यामुळे शैलेश हायप्रोफाईल जीवन जगत असल्याचे तिला वाटू लागले होते. त्यानंतर त्यांचे बोलणे वाढले मग तो तिच्याशी फोनवर बोलू लागला. मग काय एके दिवशी त्याने तिला प्रेम व्यक्त केले. मग फेब्रुवारी 2023 मध्ये दोघे वाशी येथे भेटले आणि त्यानंतर त्यांची भेट वाढत गेली. काही दिवसांतच शैलेशने तिला लग्नाची मागणीही घातली. त्यानंतर तरुणीने होकारही दिला. शैलेश यावर थांबला नाही तर त्याने तिच्या घरी जाऊन तिच्या आईशीही लग्नाबद्दल बोलला. त्यामुळे मुलीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला.
advertisement
याच्या पुढे शैलेशने फोटोशूटसाठी पैसे लागतात असे सांगून दीड लाख रुपये घेतले. नंतर बीएमडब्ल्यू कार घेण्याचे स्वप्न दाखवत तिच्या नावाने कार बुक केली. डाउन पेमेंट, टोकन मनी आणि डीलरला एनईएफटी असे मिळून तिने 9 लाखांहून अधिक रक्कम दिली. पुढे वडिलांचा आजार आणि नवीन कंपनीच्या कामाचे कारण सांगून त्याने अधिक पैसे घेतले. 27 फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2023 दरम्यान तरुणीने शैलेशला एकूण 27 लाख रुपये दिले.
advertisement
काही दिवस गेल्यानंतरही पैसे न मिळाल्याने तिने मार्चमध्ये भांडुप पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेली. हे समजताच शैलेशने तिला 3 लाख रुपये परत दिले. पण बाकीच्या पैशांबाबत तो सतत टाळाटाळ करत होता. मात्र काही दिवसांत तो गायब झाला. मात्र नोव्हेंबर महिन्यात विष्णूनगर पोलिसांनी शैलेशला अटक झाल्याची बातमी तरुणीला समजताच ती घाबरली आणि तिनेही पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. दरम्यान आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : ठाण्याचा 'रील स्टार' पुन्हा चर्चेत; इंजिनीअर तरुणीने सांगितला हादरवणारा प्रकार


