कोरोनात नवरा गेला, पुन्हा नवी सुरुवात करायचं ठरवलं, हाताला हळद लागण्याआधी महिलेसोबत घडलं भयंकर

Last Updated:

Thane News : ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 14 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. नेमका हा प्रकार कसा घडला ते सविस्तर जाणून घेऊयात.

Thane Crime
Thane Crime
ठाणे : ठाणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथे एक महिलेच्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला होता तिच्या पाठी तिचा 12 वर्षाचा मुलगाही आहे. यानंतर महिलेने लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या वाट्याला आली ती फसवणूक आणि निराशा. जाणून घेऊया त्या दिवसांत नेमकं महिलेसोबत काय घडलं आणि कसा झाला तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रकार ठाणे शहरातील असून पीडीत महिला आपल्या 12 वर्षाच्या मुलासह येथे राहते. कोरोना काळात महिलेच्या पतीने निधन झाले होते. घडलेल्या या घटनेमुळे महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर होती. पण 2023 मध्ये तिने एक मॅरेज अॅपवर नोंदणी केली आणि या अॅपच्या माध्यमातून तिची ओखळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या समीर उर्फ हार्दिक नाईक या व्यक्तीशी झाली. मग सुरु झाला तो फसवणूकीचा प्रकार. दिवसांवर दिवस जात गेले समीरने तिच्याशी सातत्याने संपर्क ठेवत गोड बोलून तिचा विश्वास संपादन करुन घेतला.
advertisement
महिलेर स्वत:चा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिच्याशी लग्नाची तयारी सुरू असल्याचे सांगत घणसोली येथे फ्लॅट बुकींग करण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी पैसे आवश्यक असल्याचे सांगत त्याने महिलेकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 12 लाख 6 हजार 700 रुपये घेतले. इतकेच नाही, तर महिलेच्या मामेभावाकडूनही दोन लाख रुपये उकळले. या प्रकारे एकूण 14 लाख रुपयांचा गंडा या भामट्याने घातला.
advertisement
नंतर सुरु झाला टाळाटाळीचा खेळ
नंतर तो सतत टाळाटाळ करू लागला. फोन न उचलणे, संपर्क न ठेवणे असे प्रकार सुरू झाल्यानंतर महिलेला संशय आला. तिने चौकशी केली असता समोर आले की, त्याने दिलेले सर्व आश्वासन खोटे होते आणि तो विवाहाच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक करत होता.
घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने ऑनलाईन मॅरेज अॅप्सवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांनी अशा अॅपवर नोंदणी करताना अत्यंत सतर्क राहावे, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
कोरोनात नवरा गेला, पुन्हा नवी सुरुवात करायचं ठरवलं, हाताला हळद लागण्याआधी महिलेसोबत घडलं भयंकर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement