बक्कळ पैसा आणि सुख-समृद्धी; राहूला अत्यंत प्रिय आहेत या २ राशी
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, राहुला (Rahu) क्रोधित आणि मायावी छाया ग्रह मानलं जातं. राहु बहुतांश वेळा अशुभ परिणाम देतो, असं म्हणतात. परंतु अशा काही राशी आहेत, ज्या राहूला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांच्यावर राहूची नेहमी कृपादृष्टी असते.
वृश्चिक राहूची आवडती रास वृश्चिक आहे. या राशीवर त्याचे आशीर्वाद नेहमीच असतात. या राशीचे लोक नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करतात.
वृश्चिक राशीच्या लोकांकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतात आणि ते नेहमी आनंदी आणि समृद्धीचे जीवन जगतात.
सिंह सिंह राशी देखील राहूची अत्यंत प्रिय रास आहे. राहूच्या कृपेमुळे यांना जीवनात कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही.
राहु सिंह राशीत असताना या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होतो. ते जीवनातील सर्व प्रकारचे सुख उपभोगतात.
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी त्याची पुष्टी करत नाही.