नववर्षात घरातील ‘या’ वस्तू ठेवू नका रिकामी, जाणून घ्या कारणं
नवं वर्ष सुखाचं तसेच समृद्धीचं जावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र यात वास्तुशास्त्राचाही मोठा वाटा असतो.
नवं वर्षाची सुरुवात शुभं होण्यासाठी वास्तुशास्त्राविषयी काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे.
देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी या, पाच गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.
लक्ष्मीच्या उपस्थितीमुळे तुमच्या घरात आणि वैयक्तिक आयुष्यात आर्थिक संकटे आणि समस्या येणार नाहीत.
घराची तिजोरी, म्हणजेच पैसे ठेवण्याची जागा कधीही रिकामी ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, गरजेच्या वेळीही त्यात काही पैसे ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामी ठेवू नये.
घरातील धान्यांची भांडी रिकामी ठेवणे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार पैशाचे पाकीट कधीही रिकामी ठेवू नये, असं केल्यास गरिबी येण्याची शक्यता आहे.
वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, News18 मराठी याचे समर्थन अथवा दावा करत नाही.