वसंत पंचमीला आणा ही एक गोष्ट घरी, सोन्यासारखे चमकेल नशीब!

हिंदू कॅलेंडरनुसार, वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो.

यावेळी २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. वसंत ऋतूही याच वेळी सुरु होतो असे म्हटले जाते.

वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. हा दिवस शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो.

जाणून घेऊयात या शुभ दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात.

वसंत पंचमीच्या दिवशी घरामध्ये पिवळ्या फुलांची खरेदी अवश्य करावी, देवी पार्वतीला पिवळी फुले खूप प्रिय असतात असे मानले जाते.

पौराणिक मान्यतेनुसार, यादिवशी दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते.

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर, देवी सरस्वतीची मूर्ती घरी आणावी. ती मूर्ती किंवा चित्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करा.

हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी इच्छित असल्यास नवे वाहन खरेदी करू शकता.

येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी याचा दावा करत नाही.