घरासमोर कावळ्याचं कांव-कांव करणं कशाचे असतात संकेत?

ज्योतिषशास्त्रानुसार, घरासमोर कावळ्याचं कांव-कांव करणं अनेक संस्कृतींमध्ये शकुन मानला जातो. हा शकुन शुभ-अशुभ दोन्ही असू शकतो.

काही परंपरा अशा आहेत, ज्यात घरासमोर कावळ्याचं कांव-कांव करणं हे घरी पाहुणे येण्याचे संकेत मानले जाते.

काही लोकांच्या मते, कावळा कुठल्या दिशेला बसला आहे, तो कसा आवाज करतो, त्यावरून तो शुभ की अशुभ संकेत देणार हे ठरतं.

ज्योतिषशास्त्रानुसार, कावळ्याला पाणी पिताना पाहणं हा अनेकदा धन लाभाचा संकेत मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, कावळ्याच्या तोंडात चपाती दिसली, तर तो मनोकामना पूर्ण होण्याचा संकेत मानला जातो.

कावळ्याचं कांव-कांव करणं हे कधीकधी कार्यात बाधा येण्याचे संकेत मानले जातात.

हे शारीरिक आणि आर्थिक नुकसानीचे सुद्धा संकेत असू शकतात.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून, कावळा सामाजिक आणि बुद्धिमान पक्षी आहे, तो आवाजाच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांना धोक्याचे आणि इतर घडामोडींबद्दल सूचित करतो.

येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी याचा दावा करत नाही.