संध्याकाळी पैश्याचे व्यवहार का करू नयेत? जाणून घ्या कारणं

तुमच्या लक्षात आले असेल की अनेकदा पैसे एका बाजूने येतो आणि दुसऱ्या बाजूने जातो, पैसे कमावल्यानंतर आपण त्याचा अनेक प्रकारे वापर करतो आणि पैश्यांची देवाणघेवाण चालू राहते.

पैशाच्या व्यवहाराबाबत शास्त्रात काही नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केलेच पाहिजे, अन्यथा जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

घरातील वडीलधारी मंडळी किंवा आजी अनेकदा सांगतात की, कोणीही पैसे घेऊ नका आणि संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नका.

वडीलधाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी राहाल आणि भविष्यात अशुभ घटनांपासून वाचाल.

संध्याकाळच्या वेळी कोणालाही कर्ज देऊ नये आणि कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

संध्याकाळच्या वेळेसोबतच ब्रम्ह मुहूर्त देखील पैश्याच्या व्यवहारासाठी योग्य मानला जात नाही. ब्रम्ह मुहूर्त हा देवी-देवतांच्या पूजेचा काळ मानला जातो. असे मानले जाते की, यावेळी जर पैश्याची देवाणघेवाण केली तर पैसे टिकत नाहीत.