घराच्या उत्तर दिशेस चुकूनही या ५ गोष्टी ठेवू नका, होईल आर्थिक नुकसान
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेस काही वस्तू ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. या वस्तू उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक नुकसान होते.
वास्तविक, उत्तर दिशेचा स्वामी कुबेर आहे. आणि काही वस्तू या जागेत ठेवणे अशुभ मानलं जात.
जर तुम्ही घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला कॉम्प्युटर, टीव्ही, फ्रिज किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवली असेल, तर ती ताबडतोब इतर ठिकाणी ठेवा.
डस्टबिन किंवा स्टोररुम उत्तर दिशेला ठेवू नये. या दिशेला कचरा ठेवल्याने आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागू शकतो.
काळ्या रंगाच्या वस्तू उत्तर दिशेला ठेवू नये. तसेच खिडक्या किंवा दारांवर काळे पडदे लावणे टाळा.
तुटलेल्या वस्तू देखील उत्तर दिशेला ठेवू नयेत. अशा गोष्टी उत्तर दिशेला ठेवल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.
सोफा, बेड, कपाट किंवा कोणतेही जड फर्निचर उत्तर दिशेला ठेवणे टाळावे. अशा गोष्टींमुळे अपार हानी होते.
घराच्या उत्तर दिशेला तुळशी किंवा मनी प्लांट लावणे शुभ असते. या दिशेला तुम्ही धातू किंवा क्रिस्टल कासव देखील ठेवू शकता.
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी याचा दावा करत नाही.