वर्षातील पहिल्या एकादशीला करा ‘हे’ काम, होईल लाभ!
वर्षातील पहिली एकादशी म्हणजेच पौष पुत्रदा एकादशी १० जानेवारीला येणार आहे.
वर्षभरात २४ एकदशी आणि महिन्यात २ एकादशी येतात. एकादशीचे व्रत विशेष मानले जाते.
पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात.
ज्योतिषांच्या मते, एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
चला तर मग जाणून घेऊया पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित कोणते काम किंवा उपाय करावेत.
पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीला लाल कपडा अर्पण करून तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात.
एकादशीच्या दिवशी तुळशीला लाल कलव बांधावा. असे म्हटले जाते की, या उपायाने सर्व आर्थिक समस्या संपतील.
त्याच बरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे, असे केल्याने व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
या दिवशी संध्याकाळच्या पूजेनंतर तुशीची प्रदक्षिणा करून माता तुळशीच्या मंत्राचा जप करावा.