शनिवार वाड्यासमोर बटाट्याचा बाजार भरायचा म्हणून मंदिराला हे नाव पडले.
शनिवार वाड्याच्या परिसरात गांजा/भांग विकली जायची म्हणून मंदिराला ह्या नावाने ओळखले जाते.
पुण्याच्या रास्तापेठेत पेशव्यांच्या फौजेचे उंट बांधले जात असल्याने येथील मंदिराला ‘उंटाड्या मारुती’ म्हणतात.
पानिपतच्या युद्धा वेळी येथील मूर्ती डोलू लागली, म्हणून या मंदिराला ‘डुल्या मारुती’ म्हणतात.
तुळशीबाग परिसरात जिलेबी बनवणारे मिठाईवाले राहत होते. म्हणून ‘जिलब्या मारुती’ असे नाव पडले.
ससून हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आलेले टिनपत्रे या मंदिरात ठेवण्यात आले म्हणून ‘पत्र्या मारुती’ असे नाव पडले.