घरातील ‘या’ पवित्र जागी ठेवा मोरपिसे, तिजोरी जाईल पैशाने भरून

वास्तुशास्त्रात, मोराच्या पिसांचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. ज्या घरामध्ये मोराची पिसे असतात त्या घरात नेहेमीच समृद्धी असते असं मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोराची पिसे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक वातावरण राहते.

वास्तुशास्त्रानुसार, मोराचे पीस घरामध्ये योग्य आणि पवित्र ठिकाणी ठेवल्यास कधीही पैश्याची कमतरता भासत नाही.

जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर वास्तुशास्त्राच्या सल्याने तुम्ही घराच्या या ठिकाणी मोराची पिसे ठेवू शकता.

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी मोराचे पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार पूजा खोलीत मोराची पिसे ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात.

विशेषतः जर तुम्ही पूजेच्या खोलीत देवी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ मोराची पिसे लावली तर तुमचे नशीब बदलते.

देवी लक्ष्मीच्या कृपेने अशा घरात कधीही पैश्याची कमतरता भासत नाही. कुटुंबाची संपत्ती वाढू लागते.

या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा दावा News18 मराठी करत नाही. सविस्तर आणि अधिक माहितीसाठी, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.