२०२५ मध्ये गृहप्रवेशासाठी कोणते दिवस आहेत शुभ? जाणून घ्या

हिंदू धर्मात नवीन घरात प्रवेश कारण्यापूर्वी गृहप्रवेशाची परंपरा पाळली जाते. या परंपरेतही शुभ मुहूर्ताला खूप महत्व आहे.

२०२५ मध्ये गृहप्रवेशासाठी कधी-कधी शुभ मुहूर्त आहेत, जाणून घेऊयात.

जानेवारी २०२५ मध्ये गृहप्रवेशासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही.

फेब्रुवारीमध्ये गृहप्रवेशासाठी ६,७,८,१४,१५,१७ हे शुभ दिवस आहेत.

मार्च महिन्यात १,५,६,१४ आणि १५ या तारखा गृहप्रवेशासाठी शुभ आहेत.

एप्रिलमध्ये गृहप्रवेशासाठी एकचं शुभं मुहूर्त असून, या महिन्याच्या ३० तारखेला तुम्ही गृहप्रवेश करू शकता.

मे २०२५ मध्ये १, ७, ८, ९, १०, १४, १७, २२, २३, २८ हे शुभ मुहूर्त आहेत, तर जूनमध्ये ४ आणि ६ या तारखा शुभ आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०२५ मध्ये गृहप्रवेशासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही, २३, २४, आणि २९ ऑक्टोबर हे गृह्प्रवेशसाठी शुभ मुहूर्त असतील.

नोव्हेंबर मध्ये ३, ६, ७, ८, १४, १५, २४, २९, आणि डिसेंबर मध्ये १, ५ आणि ६ हे शुभ दिवस असतील.

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि सामान्य माहितीवर आधारित असून News18 मराठी याला कोणताही दुजोरा देत नाही.