मकर संक्रातीला ‘या’ राशीला मिळणार आनंदाची बातमी! पाहा, तुमचे राशिभविष्य

१४ जानेवारी मकर संक्रात असून सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तर शनि देव त्यांच्या मुळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहेत.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून जे लोक राजकारणात आहेत, त्यांना यश मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहणार आहात. थांबलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून कुटुंबासोबत आनंदात दिवस व्यतीत होणार आहे. एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे मन भरून येईल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर भरपूर काम राहणार आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवसायात प्रगती होईल तसेच नवीन प्रोजेक्ट आल्यामुळे कामे वाढत आहेत.

सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून तुम्ही इतरांची मदत करणार आहात. दुसऱ्यांची मदत केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून ज्येष्ठांची सेवा आणि धार्मिक कार्यांमध्ये पैसा खर्च करणार आहात. विरोधकांवर तुम्ही मात करणार आहात.

तुळ राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून शैक्षणिक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नवीन काम सुरू होऊ शकते.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही समाधानी असाल. थांबलेली कामे पूर्ण होतील.

धनु राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून घरातील वस्तूंवर खर्च करावा लागेल. तुमच्या सुख-साधनांमध्ये वाढ होणार आहे.

मकर राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून जे व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला नफा होईल. आर्थिक स्थिती सुधारणा होणार आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ओके आहे कारण अचानक तब्येत बिघडल्यामुळे तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला यात खर्च वाढणार आहे.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून वैवाहिक जीवनात आनंद असेल. जवळचा किंवा लांबचा प्रवास होवू शकतो त्यामुळे लाभ मिळेल.

या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा दावा News18 मराठी करत नाही. सविस्तर आणि अधिक माहितीसाठी, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.